AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambedkar Jayanti : डॉ.आंबडेकर जयंतीनिमित्त CM केसीआर राव यांनी केले बाबासाहेबांच्या 125 फूट पुतळ्याचे अनावरण

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर रावच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री कडियाम श्रीहरी गरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्या समितीने निश्चित केलेल्या निकषांनुसार बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

Ambedkar Jayanti : डॉ.आंबडेकर जयंतीनिमित्त CM केसीआर राव यांनी केले बाबासाहेबांच्या 125 फूट पुतळ्याचे अनावरण
बाबासाहेब आंबेडकरImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Apr 14, 2023 | 11:53 AM
Share

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी हैदराबादमधील एनटीआर गार्डनमध्ये डॉ भीमराव आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळा बसवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ९८ वर्षीय मूर्तिकार पद्म भूषण राम वनजी सुतार कृष्णा यांना यावेळी बोलवण्यात आले होते. यावेळी त्यांचा सत्कार ही करण्यात आला.

मुख्यमंत्री केसीआरच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री कडियाम श्रीहरी गरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा एनटीआर गार्डन परिसरात उभारण्याचा निर्णय घेतला. डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याच्या उभारणीसाठी विविध संस्थांकडून माहिती संकलित करण्यात आली. शासनाने 16 सप्टेंबर 2020 रोजी प्रकल्पासाठी 146.50 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आणि निविदा मेसर्स केपीसी प्रोजेक्ट्स लिमिटेड, हैदराबादला देण्यात आली.

काय म्हणतात मुख्यमंत्री

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, केवळ दलित, आदिवासी, बहुजनच नव्हे तर भारतातील लोकांना जिथे जिथे भेदभावाचा सामना करावा लागला. पण बाबासाहेबांमुळे त्यांना आता सन्मान मिळाला. त्यांच्यासाठी आपण जे काही करू ते कमीच आहे. आता सरकार राज्य सचिवालयाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणार आहे.

ही आहेत वैशिष्ट

  • पेडेस्टल उंची: 50 फूट
  • मूर्तीची उंची: 125 फूट
  • पेडेस्टल स्ट्रक्चरमध्ये बिल्ट-अप एरिया:
  • तळमजला : 2066 Sq.ft
  • टेरेस फ्लोअर : 2200 Sq.ft
  •  इमारतीचे बांधलेले क्षेत्रः ६७९२ चौ.फूट
  • एकूण बांधलेले क्षेत्रः 26258 चौ.फू.
  • मेमोरियल बिल्डिंगमधील सुविधा:
  • बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे प्रदर्शन करणारे संग्रहालय आणि गॅलरी.
  • लँडस्केप आणि हिरवळ: 2.93 एकर
  • अंदाजे 450 कारसाठी पार्किंग.
  • लिफ्टची प्रवाशी क्षमता 15
  • पुतळ्याचा आर्मेचर स्ट्रक्चरमध्ये वापरलेले स्टील : 360 एमटी

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.