AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat ट्रेनमधील जेवणात पुन्हा झुरळ; प्रवाशांचा संतापाचा पारा चढला

वंदे भारत ट्रेनमधील जेवणात पुन्हा झुरळ आढळले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पण असाच प्रकार घडला होता. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर याविषयीची तक्रार करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे IRCTC ने पुन्हा माफीनामा सादर केला आहे. प्रवाशांनी या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

Vande Bharat ट्रेनमधील जेवणात पुन्हा झुरळ; प्रवाशांचा संतापाचा पारा चढला
वंदे भारत ट्रेनच्या जेवणात आढळले झुरळ
| Updated on: Jun 21, 2024 | 9:04 AM
Share

Cockroach Found in Meal : वेगवान आणि आरामदायक प्रवासासाठी वंदे भारत ट्रेन ओळखल्या जाते. पण ट्रेनमधील अन्नपदार्थाविषयी मात्र प्रवाशांनी जपून राहणेच हिताचे राहिल. गेल्या काही दिवसांपासून अन्नपदार्थांविषयी वारंवार तक्रारी होत असताना आता वंदे भारत ट्रेनमधील जेवणात पुन्हा झुरळ आढळले आहे. गेल्या वर्षी सुद्धा जुलै महिन्यात प्रवाशाच्या जेवणात झुरळ आढळले होते. आता ही तोच प्रकार घडला आहे. नेहमीप्रमाणे IRCTC ने पुन्हा माफीनामा सादर केला आहे. प्रवाशांनी या सर्व प्रकारा संताप व्यक्त केला आहे.

जेवणात सापडले झुरळ

भोपाळहून आग्राला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जोडप्याने जेवण मागितले होते. आयआरसीटीसीने दिलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचे समोर आले. या जोडप्याने रेल्वे मंत्र्यांकडे याविषयीची तक्रार केली. त्यानंतर माफीला सरावलेल्या IRCTC ने पुन्हा माफीनामा सादर केला. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर याविषयीची तक्रार करण्यात आली होती. असे प्रकार का घडत आहेत. गुणवत्तेबाबत इतका हलगर्जीपणा का करण्यात येत आहे, याविषयी मात्र आयआरसीटीने तोंडावर बोट ठेवले आहे.

काय केली तक्रार

विदित वार्श याने ही तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्याचे काका आणि काकू हे वंदे भारत एक्सप्रेसने भोपाळहून आग्राला जात होते. त्यांना देण्यात आलेल्या जेवणात मेलेले झुरळ आढळले. या 18 जून रोजी ही घटना घडली. त्याने एक्सवर याविषयीची एक पोस्ट लिहिली. त्याने अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली. आयआरसीटीसीने दिलेल्या जेवणात त्यांना झुरळ आढळले असून कृपया संबंधितांवर कठोर कारवाई करा आणि पुन्हा असे होणार नाही याची काळजी घ्या असे या पोस्टमध्ये म्हटले होते.

IRCTC माफीनाम्यासाठी तत्पर

माफी मागण्यासाठी आयआरसीटीसी पुन्हा तत्पर दिसून आले. तुमच्या प्रवासाच्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित सेवा प्रदात्याला योग्य तो दंड ठोठाविण्यात आला आहे, अशा घासून गुळगुळीत झालेल्या शब्दात आयआरसीटीसीने पुन्हा माफीनामा सादर करण्याची भूमिका निभावली.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.