AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहीद कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र, 5 जवानांना वीर चक्र, दहशतवाद्यांचा खात्मा करणारे सुभेदार संजीव कुमार कीर्ती चक्राने सन्मानित

गेल्या वर्षी 15 जून रोजी लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी रोखण्यासाठी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे एकूण 20 जवान शहीद झाले होते. कर्नल संतोष बाबू हे कमांडिंग ऑफिसर होते. चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न खोडून काढण्यासीठी कर्नल संतोष बाबू यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

शहीद कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र, 5 जवानांना वीर चक्र, दहशतवाद्यांचा खात्मा करणारे सुभेदार संजीव कुमार कीर्ती चक्राने सन्मानित
Col Santosh Babu(File photo)
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 1:06 PM
Share

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान चिनी सैनिकांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष बाबू (Col Santosh Babu) यांना आज मरणोत्तर महावीर चक्र (Mahavir Chakra) प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला. महावीर चक्र हा भारतातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. शहीद कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. कर्नल संतोष बाबू यांनी शहीद होण्यापूर्वी चिनी सैन्यासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या होत्या.

यासोबतच, गलवान व्हॅलीमध्ये ऑपरेशन स्नो-लेपर्ड दरम्यान चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या अन्य पाच जवानांनाही वीर चक्र प्रदान करण्यात आले. ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये सहभागी असलेले नायब सुभेदार नुदुराम सोरेन, हवालदार तेजेंद्र सिंह, हवालदार के पिलानी, नाईक दीपक सिंग आणि शिपाई गुरतेज सिंग यांनाही त्यांच्या शौर्य आणि पराक्रमी कारवाईसाठी वीर चक्र प्रदान करण्यात आले.

ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान 20 जवान शहीद झाले होते

गेल्या वर्षी 15 जून रोजी चिनी सैनिकांची घुसखोरी रोखण्यासाठी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे एकूण 20 जवान शहीद झाले होते. कर्नल संतोष बाबू हे कमांडिंग ऑफिसर होते. चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न खोडून काढण्यासीठी कर्नल संतोष बाबू यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. कर्नल संतोष हे 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी होते.

हे ही वाचा – देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, जाणून घ्या विविध श्रेणींमध्ये का दिले जातात शौर्य सन्मान

ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्याविरुद्ध दिलेल्या लढ्यासाठी नायब सुभेदार नुदुराम सोरेन यांना वीर चक्र मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला.

हवालदार तेजेंद्र सिंह यांना गलवान येथे चिनी सैन्याविरुद्ध शौर्य आणि पराक्रमी कारवाईसाठी वीर चक्र प्रदान करण्यात आले. गंभीर जखमी होऊनही तेजेंद्र सिंह लढत राहिले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना वीर चक्र देऊन सन्मानित केले.

याच वेळी, हवालदार के. पलानी यांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला.

शहीद झालेले नाईक दीपक सिंग यांना त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला.

शिपाई गुरतेज सिंग यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला.

राष्ट्रपती भवनात झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक लष्करी जवानांचाही सन्मान करण्यात आला.

ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र

4 एप्रिल 2020 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या कारवाईत दहशतवाद्यांना ठार मारून आणि इतर दोघांना जखमी करून शहीद झालेले चार पॅरा स्पेशल फोर्सचे (4 Para Special Forces) सुभेदार संजीव कुमार यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांना परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले. त्याचवेळी लष्करी सचिव लेफ्टनंट जनरल राजीव सिरोही यांना उत्तम युद्ध सेवा पदक दिले आहे.

दरम्यान, सोमवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल आणि शौर्याबद्दल वीर चक्र देऊन सन्मानित केले. 2019 मध्ये, अभिनंदन यांनी पाकिस्तानशी हवाई चकमकीत शत्रूचे F-16 लढाऊ विमान पाडले.

इतर बातम्या-

देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, जाणून घ्या विविध श्रेणींमध्ये का दिले जातात शौर्य सन्मान

फेसबुकवरुन शस्त्रास्त्रे, दारूगोळा विक्री, पोलीसही चक्रावले, जाणून घ्या काय आहे पाकिस्तानी लिंक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.