AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Colourful Holi: या देशात धुळवड नाहीच, रंग खेळला तर थेट तुरूंगवास

Colourful Holi: या देशात जर तुम्ही रंग खेळला तर थेट तुरुंगवास होऊ शकतो. तुम्हाला चाबकाचे फटके पण बसू शकतो. दंडही भरावा लागू शकतो. या देशात धार्मिक कायदे कडक आहेत. सामाजिक नियम तिथल्या धर्माप्रमाणे आहेत. कोणते आहेत हे देश?

Colourful Holi: या देशात धुळवड नाहीच, रंग खेळला तर थेट तुरूंगवास
होळीImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 27, 2026 | 4:36 PM
Share

Colourful Holi: होळी, धुळवड, रंगपंचमी हा भारतीय समाजाचा एक महत्त्वपूर्ण रंग आहे. या सणात आनंद आहे. दुख विसरून, नात्यातील दुरावा विसरून, अपमान विसरून एकत्र येण्याची शिकवण मिळते. एकमेकांना रंग लावत आनंद साजरा करण्यात येतो. घराघरात, मैदानात, गल्लीत रंगपंचमी साजरी केली जाते. काही ठिकाणी धुळवडीला मिरवणूक काढली जाते. देवाला रंग लावल्या जातो. मिठाई वाटली जाते. पण काही देशात, खासकरून मुस्लिम देशात होळी साजरी होत नाही. रंगपंचमी, धुळवड खेळल्यास इथं थेट तुरुंगवास होऊ शकतो. कोणते आहेत हे देश?

अनेक इस्लामिक देशांमध्ये धार्मिक आणि सामाजिक नियम अत्यंत कडक आहेत. इथं धुळवड ही सार्वजनिकरित्या साजरी करणे जवळपास अशक्य आहे. काही ठिकाणी तर रंगांच्या उधळणीवर पूर्णपणे बंदी आहे. या देशात सार्वजनिक स्तरावर धुळवड साजरी करता येत नाही. जर कोणी या देशातील धार्मिक नियम मोडले तर अशा व्यक्तीला कडक शिक्षा, कठोर शिक्षा होऊ शकते.

या देशात नाही खेळत होळी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आहे. इथं धार्मिक नियम अत्यंत कडक आहेत. हिंदू आणि शिखांची इथं संख्या गेल्या काही वर्षात रोडावली आहे. इथं होळी सार्वजनिक पद्धतीने साजरी होत नाही. इथं रंग खेळणे आणि मिरवणूक काढण्यास सक्त मनाई आहे. हा सण मंदिर अथवा घरातच खेळला जाऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी अथवा मैदानात रंगपंचमी साजरी करता येऊ शकत नाही. जर कोणी हा प्रयत्न केला तर कडक शिक्षा होते.

यासह सौदी अरब या देशातही होळी, धुळवड साजरी होऊ शकत नाही. भारतीय प्रवासी हे दुतावासात अथवा खासगी जागेत होळी साजरी करू शकतात. तर कतार आणि ओमान या देशात धार्मिक नियम कडक असले तरी भारतीयांना त्यांच्या मंदिरात, जागेत हा सण साजरा करता येतो. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करण्यास मनाई आहे. या देशात प्रशासनाच्या परवानगीशिवाय हा सण साजरा केल्यास दंड, कायदेशीर कारवाई अथवा थेट तुरुंगवास घडू शकतो.

रंग दिसल्यास कडक शिक्षा

तर काही इस्लामिक देशात होळी साजरी करणे, रंग खेळणे हा कायदेशीर गुन्हा मानल्या जातो. त्यासाठी कडक शिक्षा आहे. स्थानिक प्रशासनाच्या नियमानुसार शिक्षा होऊ शकते. अनेक मुस्लिम देशात सार्वजनिक रित्या हिंदू सण वा उत्सव साजरा करण्यास मनाई आहे. हा नियम तोडल्यास कडक शिक्षा होऊ शकते. काही ठिकाणी चाबकाचे फटके पण बसू शकतात. अर्थात हे तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून आहे.

Follow Us
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.
यावर सुनेत्रा पवारांनी बोललं पाहिजे! राज ठाकरेंची स्पष्टोक्ती
यावर सुनेत्रा पवारांनी बोललं पाहिजे! राज ठाकरेंची स्पष्टोक्ती.
सरकारकडून अडथळे का आणले जाताय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
सरकारकडून अडथळे का आणले जाताय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल.