वयाच्या 54 व्या वर्षीही फिट आणि एनर्जेटिक आहेत प्रियंका गांधी! सकाळी आवर्जून करतात या 2 गोष्टी
Priyanka Gandhi Fitness Routine: वाढत्या वयासोबत फिटनेस टिकवून ठेवणं अनेकांसाठी आव्हान असतं. मात्र, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वयाच्या 54 व्या वर्षीही अगदी फिट आणि एनर्जेटिक आहेत. त्यांच्या सकाळच्या 2 गोष्टी त्या कधीच चुकवत नाही.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आपल्या व्यस्त दिनक्रमामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्या दररोज अनेक राजकीय सभ, रॅलीमध्ये सहभागी होतात. त्या मोठ्या प्रमाणात पायी देखील चालतात. काही दिवसांपूर्वी त्या एका लोखंडी गेटवर चढल्याचा प्रसंग समोर आला होता, त्यानंतर त्यांच्या फिटनेसचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात आलं. वयाची 54 वर्षे पूर्ण झाली असतानाही त्या ज्या उत्साहाने आणि चपळाईने काम करतात, ते अनेकांचं लक्ष वेधून घेतं. राजकीय जबाबदाऱ्या सांभाळण्यासोबतच दोन मुलांची आई म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्याही त्या पार पाडतात. एवढ्या व्यस्त जीवनशैलीतही त्या स्वतःला फिट आणि सक्रिय कसं ठेवतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घेऊया त्यांच्या फिटनेस आणि डाएट रुटीनविषयी.
सकाळी योगा आणि वॉकिंग
प्रियंका गांधी यांच्या दिवसाची सुरुवात योगासने आणि चालण्याने होते. बाहेर फिरायला जाणं शक्य नसेल, तर त्या ट्रेडमिलवर सुमारे अर्धा तास चालतात. नियमित चालण्यामुळे शरीर सक्रिय ठेवण्यास मदत होते, तर योगामुळे शरीराची लवचिकता टिकवण्यास मदत होऊ शकते.
कधीही चुकवत नाही नाश्ता
सकाळचा नाश्ता ही त्यांच्या दिनचर्येतील आणखी एक महत्त्वाची सवय आहे. नाश्त्यामध्ये त्या पोहे किंवा कॉर्न फ्लेक्ससारखे पदार्थ खातात. दिवसाची सुरुवात पौष्टिक आहाराने केल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळण्यास मदत होते.
आहाराकडेही विशेष लक्ष
प्रियंका गांधी यांच्या आहारात घरगुती पदार्थांचा समावेश असतो. दुपारच्या जेवणात डाळ, भात, पोळी, हिरव्या भाज्या आणि लिंबू घातलेलं सलाड असतं. रात्रीच्या जेवणात त्यांना बिर्याणी आणि इटालियन पदार्थही आवडतात. याशिवाय स्नॅकिंगमध्ये त्या ड्राय फ्रूट्स किंवा फळं खातात.
दररोज थोडा व्यायाम करण्यावर भर
प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्या फिटनेससाठी फार कठीण व्यायाम करत नसल्या, तरी दररोज काही ना काही शारीरिक हालचाल करतात. नियमितता राखणं हा त्यांच्या दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.
कधीच टाळत नाही सकाळच्या या 2 सवयी
प्रियंका गांधी आपल्या दिवसाची सुरुवात योगा आणि व्यायामाने करतात. याशिवाय, त्या नाश्ता करणंही कधीच टाळत नाहीत. नाश्ता केल्याशिवाय त्या घराबाहेर पडत नाहीत. सकाळच्या नाश्त्यात त्या पोहे किंवा इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करतात. तसेच, दिवसभरात शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी त्या साधारण 2 ते 3 लिटर पाणी पितात.
