AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला गेहलोत समर्थक आमदारांचा विरोध; हायकमांडसमोर दोन प्रमुख अटी

मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून राजीनामा दिलेल्या आमदारांनी आता काँग्रेस हायकमांडसमोर दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य होणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला गेहलोत समर्थक आमदारांचा विरोध; हायकमांडसमोर दोन प्रमुख अटी
| Updated on: Sep 26, 2022 | 11:10 AM
Share

जयपूर : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा द्यावा लागणार आहे. अशोक गेहलोत यांच्यानंतर काँग्रेसचे नेते सचिन पायलट हे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. मात्र सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला गेहलोत समर्थक आमदारांनी  विरोध केला आहे. याच मुद्द्यावर गेहलोत गटाच्या तब्बल 92 आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. 92 आमदारांनी  राजीनामा दिल्यानं राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अस्थिर बनले आहे. या बंडखोर आमदारांसोबत  पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे. या आमदारांनी आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत.

काय आहेत अटी?

मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून राजीनामा दिलेल्या आमदारांनी आता काँग्रेस हायकमांडसमोर दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत. त्यातील पहिली प्रमुख अट अशी आहे की 2020 च्या राजकीय संकटात सरकार वाचवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांना मुख्यमंत्री बनवावं

तर दुसरी अट अशी आहे की, जोपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही, तोपर्यंत आमदारांची बैठक बोलावू नये . आता हायकमांड या आमदारांच्या अटी मान्य करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सचिन पायलट घेणार सोनिया गांधींची भेट

अशोक गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर राजस्थानचा नवा मुख्यमंत्री कोण असणार हे ठरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सचिन पायलट हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. गेहलोत समर्थक आमदारांनी सचिन पायलट यांच्या  मुख्यमंत्रीपदाला विरोध केल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सचिन पायटल यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करत राजस्थानमध्ये एकाच वेळी 92 आमदारांनी राजीनामे दिले आहेत,

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच