AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : ‘हिंदू म्हणता, पण तुम्हाला हिंदू धर्म समजलेला नाही’, संसदेत राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi : "शिवाची वरात आणि चक्रव्युहामध्ये लढाई आहे. आम्ही चक्रव्यूह तोडण्याच काम करतो. मनरेगा, हरीत क्रांती ही चक्रव्यूह मोडणारी काम आहेत. यामुळे देशात आनंद येतो, आत्मविश्वास वाढतो" असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi : 'हिंदू म्हणता, पण तुम्हाला हिंदू धर्म समजलेला नाही', संसदेत राहुल गांधींचा हल्लाबोल
narendra modi and rahul gandhiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 29, 2024 | 3:01 PM
Share

“बजेटमध्ये जातीय जनगणनेचा मुद्दा असावा. 95 टक्के भारताला दलित, आदिवासी, मागास, गरीब जनरल कास्ट, अल्पसंख्यांक समाजाला जातीय जनगणना हवी आहे. सरकार हलवा वाटते. 2 ते 3 टक्के लोक हलवा वाटतात. जातीय जनगणनेने देश बदलेलं” असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. “देशातील पिछडे अभिमन्यू नाही. चक्रव्यूह भेदणारे आहेत. पहिलं पाऊल इंडिया आघाडीने उचललं आहे. तुमच्या पंतप्रधानांचा आत्मविश्वास आम्ही उडवून टाकला आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

“हे कमल फॉर्मेशनवाले लोक आहेत. त्यांना हिंदुस्तानचा स्वभाव समजलेला नाही. हिंसाचार, द्वेष भारताचा स्वभाव नाही. हिंदुस्थानचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येक धर्मात चक्रव्यूह विरोधात फॉर्मेशन आहे” असं राहुल गांधी म्हणाले. “हिंदू धर्मात शिवाच्या वरातील कुठल्याही धर्माचा व्यक्ती येऊन नाचू शकतो, गाऊ शकतो. शिख धर्मात कोणालाही सेवा करण्यापासून रोखता येत नाही. इस्लाममध्ये कोणीही मशिदीत जाऊ शकतो. शिवाची वरात आणि चक्रव्युहामध्ये लढाई आहे. आम्ही चक्रव्यूह तोडण्याच काम करतो. मनरेगा, हरीत क्रांती ही चक्रव्यूह मोडणारी काम आहेत. यामुळे देशात आनंद येतो, आत्मविश्वास वाढतो” असं राहुल गांधी म्हणाले.

चक्रव्यूह शिवाच्या वरातीला हरवू शकत नाही’

“चक्रव्यूह शिवाच्या वरातीला हरवू शकत नाही. तुम्ही स्वत: हिंदू म्हणता, पण तुम्हाला हिंदू धर्म समजलेला नाही” अशा शब्दात भाजपावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावरुन बोलताच सत्ताधारी बाकावरुन गदारोळ सुरु झाला. त्यावेळी ते म्हणाले की, “मी काही अपमान केलेला नाही. आयुष्यभर हिंदू धर्माचा मी अपमान करु शकत नाही” असं राहुल गांधी म्हणाले.

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.