Corona Second Wave | 21 मे ते 31 मे, दहा दिवसात नव्या कोरोना रुग्णांमध्ये एक लाखांहून अधिक घट, पाहा संपूर्ण आकडेवारी

गेल्या 50 दिवसांतील हा 24 तासांच्या कालावधीतला निचांकी आकडा आहे. (Corona Cases Second wave decreasing)

Corona Second Wave | 21 मे ते 31 मे, दहा दिवसात नव्या कोरोना रुग्णांमध्ये एक लाखांहून अधिक घट, पाहा संपूर्ण आकडेवारी
Corona
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 10:05 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) गेले दहा दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. दोन दिवसांचा अपवाद वगळता 21 मे ते 31 मे या कालावधीत नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या 50 दिवसांतील हा 24 तासांच्या कालावधीतला निचांकी आकडा आहे. ताज्या आकडेवारीनुसार कालच्या दिवसात 1 लाख 52 हजार 734 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 128 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. (Corona Cases in India in the last 24 hours Second wave decreasing)

दिनांक – एका दिवसातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या

21 मे – 2 लाख 59 लाख रुग्ण 22 मे – 2 लाख 57 हजार रुग्ण 23 मे – 2 लाख 40 हजार रुग्ण 24 मे – 2 लाख 22 हजार रुग्ण 25 मे – 1 लाख 95 हजार रुग्ण 26 मे – 2 लाख 8 हजार रुग्ण 27 मे – 2 लाख 11 हजार रुग्ण 28 मे – 1 लाख 86 हजार रुग्ण 29 मे – 1 लाख 74 हजार रुग्ण 30 मे – 1 लाख 65 हजार रुग्ण 31 मे – 1 लाख 52 हजार रुग्ण

टक्केवारी काय सांगते

कोरोनातून बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) – 91.60% साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट – 9.04% दैनिक पॉझिटिव्हिटी रेट – 9.07% (सलग आठवडाभर दहा टक्क्यांहून कमी) (Corona Cases Second wave decreasing)

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 80 लाख 47 हजार 534 वर गेला आहे. देशात 2 कोटी 56 लाख 92 हजार 342 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 29 हजार 100 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 20 लाख 26 हजार 92 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. कालच्या तुलनेत अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या 88,416 ने कमी झाली.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 31 लाख 54 हजार 129 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

एकूण रूग्ण –  2,80,47,534

एकूण डिस्चार्ज –2,56,92,342

एकूण मृत्यू – 3,29,100

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 20,26,092

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 21,31,54,129

संबंधित बातम्या :

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांच्या घरात, कोरोनाबळीही घटते

(Corona Cases in India in the last 24 hours Second wave decreasing)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.