AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लसीकरणाऱ्या ट्रायलमध्ये तुम्हीही होऊ शकता सहभागी, AIIMS ने प्रसिद्ध केली जाहिरात

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) लवकरच कोव्हॅक्सीन (COVAXIN) लसीचं तीसरं ट्रायल सुरू करणार आहेत.

कोरोना लसीकरणाऱ्या ट्रायलमध्ये तुम्हीही होऊ शकता सहभागी, AIIMS ने प्रसिद्ध केली जाहिरात
कोव्हॅक्सिन लस
| Edited By: | Updated on: Dec 24, 2020 | 3:06 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना लसीच्या (coronavirus vaccine) ट्रायलमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) लवकरच कोव्हॅक्सीन (COVAXIN) लसीचं तीसरं ट्रायल सुरू करणार आहेत. त्यासाठी ते स्वयंसेवकांच्या शोधात आहेत. त्यामुळे तुम्हालाही जर देशी कोरोना लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी व्हायचं असेल तर 31 डिसेंबरला तुम्ही नाव नोंदणी करू शकता. (corona vaccine news aiims asking for volunteers for covaxin phase 3 clinical trial)

एम्सने जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिनची पहिली आणि दुसरी चाचणी (COVAXIN Trail) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता या लसीची तीसरी चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वयंसेवक म्हणून तुम्हीही नाव नोंदवू शकता. या कोरोना लसीला आयसीएमआर आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी मिळवून बनवलं आहे.

कोव्हॅक्सीनच्या चाचणीमध्ये कसे व्हाल सहभागी?

कोव्हॅक्सिनच्या शेवटच्या चाचणीत भाग घेऊ इच्छिणा्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पहिल्या क्रमांकावर मेसेज करावा लागणार आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर मेल करूदेखील तुम्ही सहभाही होऊ शकता. ही जाहिरात कोव्हॅक्सिन चाचणीकडे लक्ष असणाऱ्या प्रोफेसर डॉ. संजय राय यांनी प्रसिद्ध केली आहे.

दरम्यान, भारताकडून ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोरोनाव्हायरस लसीला तातडीच्या वापरासाठी पुढील आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटीश औषध निर्मात्याच्या लसीसाठी हिरवा कंदील देणारा भारत हा पहिला देश असू शकतो. फायझर इंक आणि स्थानिक कंपनी भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसींसाठी ही आपत्कालीन वापराच्या अधिकृतता अर्जांवर विचार सुरू आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांना कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी उत्पन्न असणार्‍या देशांसाठी आणि गरम हवामानातील नागरिकांसाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड लस महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण ती लस स्वस्तही आहे. सोबतच लसीचे वाहतुकीकरण करणं सोपं आहे आणि सामान्य फ्रिज तापमानात दीर्घकाळ साठवलीही जाऊ शकते. त्यामुळे या लसीचा भारतीयांना फायदा होईल अशीही माहिती समोर येत आहे. (corona vaccine news aiims asking for volunteers for covaxin phase 3 clinical trial)

इतर बातम्या – 

कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री

लस येण्यापूर्वीच चिनी हॅकर्सचा डोळा; बनावट लसीची भीती, मुंबई पोलीस सतर्क

(corona vaccine news aiims asking for volunteers for covaxin phase 3 clinical trial)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.