COVID-19 vaccine: कोरोनाच्या लशीची आज घोषणा? तज्ज्ञ समितीच्या सदस्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

फायझर कंपनीनेही तातडीच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आज केंद्र सरकार काय घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. | COVID 19 vaccine

COVID-19 vaccine: कोरोनाच्या लशीची आज घोषणा? तज्ज्ञ समितीच्या सदस्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

नवी दिल्ली: नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीयांना कोरोना लसीसंदर्भात (Coronavirus vaccine) आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीच्या गुरुवारच्या बैठकीनंतर तसे संकेत देण्यात आले. नववर्षांत काही तरी आपल्या हाती पडू शकेल, इतकेच मी आपल्याला सूचित करू शकतो, असे वक्तव्य औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी केले. (Corona vaccine may get approval on today in India)

परिणामी सध्या भारतात परवानगीच्या प्रतिक्षेत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हीशिल्ड’ (covishield) आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ (covishield) या लसींना हिरवा कंदील दाखवला जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पुन्हा समितीची बैठक होणार आहे. फायझर कंपनीनेही तातडीच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आज केंद्र सरकार काय घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी केंद्र सरकारने 2 जानेवारीला सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्याची घोषणाही केली. त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष असतील. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे प्रामुख्याने सराव फेरीत तपासले जाईल. लसीकरणासाठी देशभरात आतापर्यंत ९६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासियांना नवा कानमंत्र दिला. देशात लसीकरणाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ अशी सूचना मी याआधी केली होती. मात्र आता ‘दवाई भी, कडाई (सावधगिरी) भी’ असा नववर्षाचा नवमंत्र असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कोट्यवधी डोस तयार करण्याची सीरमची क्षमता

‘कोविशिल्ड’ बाबत भारतासाठी चांगली गोष्ट ही की, या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये होत आहे. सीरम इन्स्टिट्युट ही लस बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीची लस निर्मिती क्षमता अफाट आहे.

आतापर्यंत सीरममध्ये तब्बल 5 कोटी कोविशिल्डच्या कुप्या तयार झाल्याची माहिती आहे. तर जुलै 2021 पर्यंत सीरमनं तब्बल 30 कोटी डोस तयार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विकसनशील देशांना लस पुरवण्यासाठी सीरमनं ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राजेनिका या कंपनीबरोबर करार केला आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ 2 जानेवारीला; ‘या’ चार जिल्ह्यांची निवड

अमेरिकी तज्ज्ञांचा दावा – जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे संपणार, पण….

कोवॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर 28 दिवस काहीच लक्षणं नाहीत, पश्चिम बंगालच्या नगरविकास मंत्र्यांना पुन्हा लस टोचली

(Corona vaccine may get approval on today in India)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI