Omicron 23 देशांमध्ये पसरला, आणखी प्रसाराची अपेक्षा- WHO ची माहिती; द आफ्रिकेत एका आठवड्यात 571% रुग्ण वाढले

"जोखीम असलेल्या" (At Risk) देशांमधून काल मध्यरात्री ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत भारतात एकूण 11 आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International flights) विविध विमानतळांवर उतरली आहेत. यामध्ये एकूण 3,476 प्रवासी होते. सर्व प्रवाशांच्या RT-PCR चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये 6 प्रवासी कोविड पॉझिटिव्ह (covid positive) आढळले आहेत.

Omicron 23 देशांमध्ये पसरला, आणखी प्रसाराची अपेक्षा- WHO ची माहिती; द आफ्रिकेत एका आठवड्यात 571% रुग्ण वाढले
WHO

नवी दिल्लीः कोविडच्या ओमायक्रॉन व्हेरियंटविषयीची (Omicron Variant) ताजी माहिती हाती आली आहे. “जोखीम असलेल्या” (At Risk) देशांमधून काल मध्यरात्री ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत भारतात एकूण 11 आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International flights) विविध विमानतळांवर उतरली आहेत. यामध्ये एकूण 3,476 प्रवासी होते. सर्व प्रवाशांच्या RT-PCR चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये 6 प्रवासी कोविड पॉझिटिव्ह (covid positive) आढळले आहेत. बाधित रुग्णांचे नमुने जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले आहेत, ज्याद्वारे त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की हे समजेल.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसू यांनी सांगितले की, आतापर्यंत किमान 23 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण नोंदवली गेली आहेत. ज्यामध्ये 6 WHO क्षेत्रांतील 5 देशांचा समावेश आहे. हा प्रसार आणखी वाढण्याची शक्याता आहे, ते म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळं जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भारतानेही विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला विशेषत: आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्रवाशांचा सर्व प्रवास इतिहास तपासला जात आहे.

दरम्यान, भारताने सामान्य आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. भारताने 15 डिसेंबरपासून सामान्य आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली होती. पण ओमिक्रोम व्हायरस पसरल्यामुळे आज हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सर्व राज्यांमध्ये, कोविड पॉझिटिव्ह रुग्ण, विशेषत: आंतरराष्ट्रीय प्रवासी, त्यांचे नमुने जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत.

इतर बातम्या

Maharashtra Rains and Weather News LIVE: राज्यात पुढच्या 24 पावसाची शक्यता, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोर वाढणार 

Neeraj chopra : पंतप्रधान मोदींच्या या योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चो


Published On - 11:20 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI