Neeraj chopra : पंतप्रधान मोदींच्या या योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्रा

ऑलंम्पिकला गेलेल्या खेळाडुंची पंतप्रधान मोदी यांनी 16 ऑगस्टला भेट घेतली होती. त्यामुळे या खेळाडुंना शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसी संवाद साधण्यास मोदींनी सांगितलं होतं.

Neeraj chopra : पंतप्रधान मोदींच्या या योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्रा

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या एका महत्वाच्या योजनची सुरूवात गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्राच्या हस्ते होणार आहे. या आठवड्यात नीरज चोप्रा अहमदाबादला जाणार आहे. तिथे मोदींच्या एका योजनचा शुभारंभ केला जाणार आहे. गोल्ड मेडल मिळाल्यानंतर देशातले अनेक तरुण नीरज चोप्राला आपला आयडल मानत आहेत. त्याचा तरुणाईवरचा प्रभाव वाढला आहे. त्याच्या मार्गदर्शनाच मोठा फायदा देशातील युवा पिढीला होणार आहे. त्याच्याकडून प्रेरणा घेत देशातली पिढी पुढे जाणार आहे.

फिटनेस, खेळ आणि आहाराशी निगडीत योजना

ऑलंम्पिकला गेलेल्या खेळाडुंची पंतप्रधान मोदी यांनी 16 ऑगस्टला भेट घेतली होती. त्यामुळे या खेळाडुंना शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसी संवाद साधण्यास मोदींनी सांगितलं होतं. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, नीरज चोप्रा 4 डिसेंबरला अहमदाबादला जाणार आहे. अहमदाबादमध्ये जाऊन नीरज चोप्रा संस्कारधाम स्कूलमध्ये योजनेचा प्ररंभ करणार आहे.

मीट द चॅम्पियन कॅम्पेन लॉन्च

केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने मीट द चॅम्पियन कॅम्पेन लॉन्च केले आहे. त्यात विद्यार्थ्यांना अनेक दिग्गज खेळाडूंकडून मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यातून देशात आणखी दिग्गज खेळाडू तयार करण्यास मदत होणार आहे.  ऑलंम्पिक खेळलेले खेळाडू या योजनेनुसार जानेवारीपासून शाळांमध्ये जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांना आणि खेळाडुंना मार्गदर्शन करणार आहेत. नीरज चोप्राने यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सर्वात लांब भाला फेकत देशाला गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं. त्यामुळे देशाची मान आणखी उंचावली आहे. त्यामुळे नीरज चोप्रासाठीची क्रेझ वाढली आहे. त्याच्या संवाद साधण्याने अनेक युवकांना मोठा फायदा होणार आहे.

PNB कडून 1 डिसेंबरपासून खास नियम लागू, तुमच्या पैशांवर काय परिणाम?

भांडण वडिलांकडे घेऊन गेल्याचा राग, शेवटी मित्राची तलावात बुडवून हत्या, 13 वर्षीय मुलाच्या कृत्याने खळबळ

पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य सरकार; आधी कुंटेंवरुन सामना, आता महाराष्ट्र सरकारच्या नियमावलींना केंद्राचा आक्षेप!

Published On - 10:58 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI