Maharashtra Corona Update | महाराष्ट्रासह गुजरातमध्ये कोरोनाची दुसरी लाट?

याआधी कोरोनाचे रुग्ण 15 दिवसांत दुप्पट व्हायचे. मात्र, आता रुग्ण दुप्पट होण्याचा दर 11 दिवसांवर आला आहे.

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रासह गुजरातमध्ये कोरोनाची दुसरी लाट?
Follow us
| Updated on: May 08, 2020 | 1:18 AM

मुंबई : देशात आता कोरोनाच्या संसर्गाने (COVID-19 Transmission Rate) वेग धरला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या माजी सदस्या शमिका रवी यांनी केलेल्या विश्लेषणानुसार 2 मे रोजी कोरोना संसर्गाचा दर 4.8 टक्के इतके होता. सध्या कोरोना संसर्गाचा दर हा 6.6 टक्क्यांवर (COVID-19 Transmission Rate) आला आहे.

याआधी कोरोनाचे रुग्ण 15 दिवसांत दुप्पट व्हायचे. मात्र, आता रुग्ण दुप्पट होण्याचा दर 11 दिवसांवर आलं आहे. हे चिंता वाढवणारं आहे. कोरोनाच्या अधिक संसर्गाचा जर विचार केला तर महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थान येथील स्थिती गंभीर आहे.

प्रोफेसर शमिका रवी यांच्या मते, इथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंगसाठी कुठलीही खास रणनीती नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडूत कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. त्यामुळे ही लाट वेळीच नियंत्रणात आणण्याची गरज आहे (COVID-19 Transmission Rate).

त्यातच कोरोनाच्या टेस्टवर भर देण्याची किती आवश्यकता आहे, हे एका उदाहरणावरुन समजून घेऊ –

केरळच्या कासरगोडमध्ये 20 हजार नागरिकांच्या टेस्टमधून 100 पॉझिटिव्ह आले. तर, मुंबईत 6000 टेस्टमधूनच 100 पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे जितक्या जास्त टेस्ट होतील, तितकं कोरोनावर आळा घालण्यात मदत होईल.

देशातली कोरोनाबाधितांची संख्या आता 50 हजारांच्या पुढं गेली आहे. त्यामुळे संसर्ग थांबवायचा असेल आणि कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आणायची असेल, तर कंटेनमेंट झोन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग या त्रिसुत्रीवर अधिक लक्ष देण्याची (COVID-19 Transmission Rate) गरज आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 17,974 वर 

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 974 वर पोहोचली आहे. आज (7 मे) दिवसभरात 1 हजार 216 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर आज राज्यात 43 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळीची एकूण संख्या 694 झाली आहे.

संबंधित बातम्या :

रुग्णांकडून भरमसाठ फी आकारल्यास कारवाई, आरोग्यमंत्र्यांचा रुग्णालयांना इशारा

Nagpur Corona | तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे नागपुरात मोठा धोका टळला

17 मेनंतर काय? लॉकडाऊन वाढवण्याचे निकष काय? सोनिया गांधींची मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

तेलंगणातील लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री केसीआर यांची मोठी घोषणा

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.