Nupur Sharma | नुपूर शर्मासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल, पैगंबरांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानं अडचणीत वाढ, पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थाही पुरविली

दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्यासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अभ्यास सुरू आहे. पण, नुपूर शर्मा यांना धमक्या आल्यानं त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

Nupur Sharma | नुपूर शर्मासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल, पैगंबरांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानं अडचणीत वाढ, पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थाही पुरविली
नुपूर शर्माच्या विवादित बयानानंतर ९ जणांविरोधात गुन्हा
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 9:42 AM

नवी दिल्ली : नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान केलंय. त्यानंतर वाद निर्माण झाला. अरब देशांनी नुपूर शर्माच्या या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केलाय. भाजपनं नुपूर शर्माला पक्षातून निलंबित केलंय. भाजपनं एक पत्र जाहीर केलं. त्या पत्रातून नुपूर शर्मा यांचं बयाण हे पक्षाच्या विचारांच्या विरोधात असल्याचं म्हटलंय. भाजपच्या (BJP) नुपूर शर्मासह 9 जणांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा एफआयआर स्पेशल सेलच्या सायबर युनिटनं (Cyber ​​Unit) दाखल केलाय. पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्यावरून नुपूर शर्मा या चर्चेत आल्या. नुपूर शर्मा व्यतिरिक्त सायबर युनिटनं भाजपचे माजी प्रवक्ता नवीन कुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal), शादाब चौहान, सबा नकवी, मौलान मुफ्ती नदीम, अब्दुल रहमान, गुलजार अंसारी, अनिल कुमान मीना आणि पूजा शकूनच्या विरोधात गुन्हे दाखल केले. खटला दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

नुपूर शर्मा यांनी मागितली माफी

भाजपतून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी त्यांचं वक्तव्य मागं घेतलंय. शर्मा म्हणाल्या, की मी माझे शब्द परत घेते. त्या म्हणाल्या, माझी इच्छा कुणाच्याही भावनांना ठेच पोहचविणं नव्हती. माझ्या शब्दांमुळं कुणाच्या धार्मिक भावनेला ठेच पोहचत असेल, तर मी माझे शब्द मागे घेते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्यासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा अभ्यास सुरू आहे. पण, नुपूर शर्मा यांना धमक्या आल्यानं त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिली सुरक्षा

वादग्रस्त बयानानंतर नुपूर शर्मा यांनी धमकी येणं सुरू झालं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना सुरक्षा प्रदान केली. नुपूर शर्मा यांनी तक्रार दिली. त्यानुसार माझ्या कुटुंबीयांनी धमकी दिली जात असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला. शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल असला, तरी दिल्ली पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरविली आहे. याचा तपास दिल्ली पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.