AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरम वाटली पाहिजे, फक्त इतक्या पैशांसाठी CRPF जवान पाकिस्तानच्या मांडीवर जाऊन बसला, देशासोबत गद्दारी

CRPF च्या 116 व्या बटालियनमध्ये असिस्टेंट सब इंस्पेक्टरच्या पदावर तैनात असलेल्या एका जवानाने देशासोबत गद्दारी केल्याच समोर आलं आहे. हा जवान ISI च्या एजन्टसना माहिती पुरवत होता. त्याच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

शरम वाटली पाहिजे, फक्त इतक्या पैशांसाठी CRPF जवान पाकिस्तानच्या मांडीवर जाऊन बसला, देशासोबत गद्दारी
Pahalgam terror attack
| Updated on: May 30, 2025 | 8:40 AM
Share

नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने ASI मोतीराम जाटला 26 मे रोजी दिल्लीतून अटक केली. पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली मोतीरामला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाच दिवस आधीच मोतीरामच ट्रान्सफर झालं होतं. मोतीराम जाट मागच्या दोन वर्षांपासून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना (जे स्वत:ला पत्रकार म्हणवत होते) त्यांना माहिती पुरवत होता, तपासातून ही बाब समोर आली आहे. या माहितीसाठी एक फिक्स अमाऊंट निश्चित होती.

मोतीराम 2023 पासूनच पाकिस्तानला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाठवत होता. NIA च्या तपासातून या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यासाठी त्याच्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पैसे पोहोचवले जात होते. विशेष माहितीसाठी 12 हजार रुपये सुद्धा दिले जायचे. मोतीराम जाट पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना प्रत्येक नवीन अपडेट द्यायचा. गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा असो किंवा सीनियर अधिकाऱ्याचा, तो प्रत्येकवेळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना माहिती द्यायचा.

किती रेट होता?

ज्यांना तो माहिती द्यायचा, त्यांनी स्वत:ला ते पाकिस्तानातील मोठ्या न्यूज चॅनलचे पत्रकार असल्याच सांगितलं होतं. त्या माहितीच्या बदल्यात दर महिन्याच्या चार तारखेला पाकिस्तानी एजेंट्स त्याला 3500 रुपये द्यायचे. हा पैसा मोतीरामच्या आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात यायचा. त्याशिवाय खास माहिती दिल्यास 1200 रुपये एक्स्ट्रा दिले जायचे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मोतीरामकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर रेट निश्चित केले होते. माहिती वेळेत आणि अचूक असल्याची खात्री पटल्यानंतरच पैसे दिले जायचे.

पाच दिवस आधी जाटची बदली

मोतीराम CRPF च्या 116 व्या बटालियनमध्ये असिस्टेंट सब इंस्पेक्टरच्या पदावर तैनात होता. पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना भारताशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीच्या टीमने 26 मे रोजी दिल्लीतून अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. 6 जून पर्यंत रिमांड देण्यात आली. या दरम्यानच्या चौकशीत त्याने अनेक खुलासे केलेत. पहलगाम हल्ल्याच्या पाच दिवस आधी जाटची बदली करण्यात आली होती. याच कारणामुळे पहलगाम हल्ल्याशी त्याचा काही संबंध आहे का? त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

अजून बरेच लोक आहेत का?

मोतीराम आधीपासूनच ISI च्या टार्गेटवर होता. म्हणूनच त्याला पैशाच आमिष दाखवून जाळ्यात ओढण्यात आलं. त्याच्याकडून बरीच गुप्त माहिती मिळवण्यात आली. सध्या NIA त्याच्या मोबाइलचा तपास करत आहे. त्याच्या जवळच्या माणसांची सुद्धा चौकशी सुरु आहे. पाकिस्तानसाठीच्या या हेरगिरी प्रकरणात अजून बरेच लोक सहभागी असू शकतात.

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.