कोंबड्याला पोलिसांची सुरक्षा, कोर्टातही हजर करावे लागणार, काय आहे प्रकरण

पंजाबमधील बठिंडामधील कोंबड्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. कारण या कोंबड्याला पोलीस संरक्षण मिळाले आहे. या कोंबड्याला कोर्टात साक्षीदार म्हणून हजर करण्यात येणार आहे. या कोंबड्यासाठी पोलिसांनी एक केअरटेकर ठेवला आहे.

कोंबड्याला पोलिसांची सुरक्षा, कोर्टातही हजर करावे लागणार, काय आहे प्रकरण
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 3:02 PM

नवी दिल्ली, दि.25 जानेवारी 2024 | सध्या कोंबड्याला पोलीस संरक्षण देण्याचे प्रकरण चर्चेत आले आहे. एक कोंबड्याला पोलिसांची सुरक्षा मिळाली आहे. पोलीस त्यांची देखभाल करत आहे. तसेच न्यायालयात त्याला साक्षीदार म्हणून हजर करावे लागणार आहे. पंजाबमधील बठिंडामधील या प्रकरणाची चर्चा सर्वत्र होत आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंबड्यांची लढाई लावण्याचा खेळासंदर्भातील हा प्रकार आहे. या लढाईत कोंबडा जखमी झाला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय नेमका प्रकार

बठिंडामधील बल्लुआना गावात कोंबड्याच्या लढाईची स्पर्धा आयोजित केली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलीस स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झाले. या स्पर्धेत जवळपास 200 जण सहभागी झाले होते. पोलीस घटनास्थळी पोहचताच सर्व जण फरार झाले. पोलिसांनी त्या ठिकाणी दोन कोंबडे आणि एक व्यक्ती मिळाला. कोंबड्याच्या लढाईच्या स्पर्धेत त्याचा छळ केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे घटनास्थळी कोंबडा जखमी अवस्थेत सापडला.

पोलिसांनी दिली सुरक्षा

घटनास्थळी जखमी झालेल्या कोंबड्याला पोलिसांच्या सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. त्याचा आहार आणि आरोग्याची काळजी पोलीस घेत आहे. पोलीस एक पुरावा आणि साक्षीदार म्हणून कोंबड्याला न्यायालयात सादर करणार आहे. पोलीस अधिकारी निर्मल सिंह यांनी सांगितले की, पोलिसांचे निर्देश मिळाल्यानंतर कोंबड्याला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. यामुळे त्याला पोलिसांच्या सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. घटनास्थळावर अनेक ट्रॉफी जप्त करण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

तीन जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्राणी अन् पशू क्रूरता कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राजविंदर याला अटक करण्यात आली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे. पोलीस कोंबड्याची काळजी एखाद्या लहान मुलाप्रमाणे घेत आहेत. त्याच्यासाठी विशेष केअरटेकर ठेवण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित.
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.