Maran Vs Maran : काव्या मारनच्या घरात नात्यापेक्षा पैसा मोठा, 24000 कोटींच्या बिझनेसवरुन लढाई, आपली माणसं बदलली
Maran Vs Maran : आयपीएलमधील नेहमीच चर्चेत असलेलं नाव म्हणजे काव्या मारन. ही सनराजयर्स हैदराबाद टीमची मालकीण आहे. आता याच काव्या मारनच्या घरात 24 हजार कोटीच्या बिझनेसवकरुन मोठी लढाई सुरु झाली आहे. आपलीच माणसं परस्पराच्या विरोधात उभी ठाकली आहेत.

भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहापैकी एक असलेल्या Sun TV Network मध्ये कौटुंबिक वाद सुरु झाला आहे. हा वाद फक्त कोर्टरुममधला ड्रामा नाही. हजारो कोटींचा वारसा, सत्ता आणि नियंत्रणाची लढाई आहे. काव्या मारनच्या घरात मोठा क्लेश सुरु झाल्याच समोर आलय. काव्या मारनचे वडील आणि काकांमधील ही लढाई आहे. विषय 24 हजार कोटीच्या बिझनेसचा आहे. DMK खासदार दयानिधी मारन यांनी आपला भाऊ आणि सन टीव्हीचा सर्वेसर्वा कलानिधी मारन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि सत्ता ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रश्न फक्त शेअर्सचा नाही, 24 हजार कोटींचा वारस पुढे कोण चालवणार? हा प्रश्न आहे.
DMK खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधि मारन यांनी आपला अब्जाधीश भाऊ आणि Sun TV Network चे चेअरमन कलानिधी मारन यांच्याविरुद्ध गंभीर कायदेशीर कारवाई केली आहे. 10 जून 2025 रोजी त्यांनी कठोर शब्दात त्यांनी एक कायदेशीर नोटीस पाठवली. यात दयानिधी यांनी आरोप केला आहे की, सन टीव्ही नेटवर्कमध्ये 2003 नंतर शेअरहोल्डिंगमध्ये असंवैधानिक पद्धतीने नियंत्रण बदलण्यात आलं. या नोटिसमध्ये मनी लॉन्ड्रिंग, फसवणूक आणि आपराधिक विश्वासघाताचा आरोप करण्यात आलाय. ही नोटीस कलानिधि मारन, त्यांची पत्नी कावेरी मारनसह सात अन्य लोकांना पाठवण्यात आलीय. ऑक्टोबर 2024 नंतर दयानिधी मारन यांनी कायदेशीर मार्ग निवडण्याची ही दुसरी वेळ आहे.
आरोप काय?
नोटिसनुसार वडील एसएन मारन यांच्या मृत्यू पश्चात शेअर्सच बेकायद हस्तांतरण करण्यात आलं. मृत्यू प्रमाणपत्र आणि उत्तराधिकारी प्रमाणपत्राशिवाय आई मल्लिका मारन यांच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर ते शेअर्स कलानिधीला सोपवण्यात आले.
15 सप्टेंबर 2003 रोजी कलानिधीने स्वत:कडे 10 रुपये प्रति शेअरच्या दराने 12 लाख शेअर विकत घेतले. त्यावेळी कंपनीच्या शेअर्सच बाजार मूल्य 2,500 ते 3,000 रुपया दरम्यान होतं. हा गंभीर फसवणूक, आपराधिक विश्वासघात असल्याचा आरोप करण्यात आलाय.
नेटवर्थ जवळपास 3 अब्ज डॉलर
सध्या कलानिधी मारनजवळ Sun TV Network मध्ये 75% हिस्सेदारी आहे. या हिस्सेदारीमुळे त्यांची नेटवर्थ जवळपास 3 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. पण हा खटला कोर्टात पुढे चालू राहिला तर Sun TV ची स्थिती आणि नियंत्रण यावर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.
Sun TV Network भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहापैकी एक आहे. त्यांच्याकडे टेलीविजन, वृत्तवाहिनी, मनोरंजन चॅनल, रेडियो स्टेशन आणि IPL टीम Sunrisers Hyderabad अशी संपत्ती आहे.
दयानिधी यांची मागणी काय?
कंपनीमध्ये 2003 च्या आधीची शेअर स्थिती लागू केली जावी.
कलानिधी यांनी मिळवलेल्या 60% हिस्सेदारीला अमान्य घोषित करावं.
मूळ कुटुंबाची हिस्सेदारी, जी कमी होऊन 20% राहिली आहे, ती पुन्हा 50% पर्यंत वाढवावी