AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk – Twitter Deal : आज न्यायालयात होणार पहिली सुनावणी, शिक्षा सुनावली जाणार का?

ट्विटरसोबत झालेला 44 बिलियन डॉलर्सचा करार रद्द करणाऱ्या एलन मस्क यांच्याविरोधात ट्विटरने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेत मस्क यांना न्यायालयात खेचले आहे. डेलवेअर येथे आज या प्रकरणाची पहिली सुनावणी होणार आहे.

Elon Musk - Twitter Deal : आज न्यायालयात होणार पहिली सुनावणी, शिक्षा सुनावली जाणार का?
आज न्यायालयात होणार पहिली सुनावणी
| Edited By: | Updated on: Jul 19, 2022 | 5:09 PM
Share

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk)आणि ट्विटर यांच्या दरम्यान झालेला करार फिस्कटला आणि जगभरात त्याची चर्चा सुरू झाली. मस्क यांनी ट्विटरसोबत (Twitter) केलेला 44 बिलियन डॉलर्सचा करार रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ट्विटरनेही मस्क यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्याचा निर्णय घेत न्यायालयात खटला दाखल केला आहे. डेलवेअर येथे आज या प्रकरणी पहिली सुनावणी (ऑनलाइन) होणार असून संपूर्ण जगाचे त्याकडे लक्ष लागले आहे. ट्विटरने ‘वॉचेल, लिप्टन, रोझेन ॲंड कॅट्झ एलएलपी’ या न्यूयॉर्कमधील सर्वात मोठ्या कंपनीकडे ट्विटरने मस्क यांच्याविरोधातील कायदेशीर लढाई लढण्याची जबाबदारी सोपवली आहे. तर ‘क्विन इमॅन्युएल अर्कहार्ट ॲंड सलिव्हॅन’ ही लीगल फर्म मस्क यांची बाजू मांडणार आहेत.

लवकर सुनावणी घेण्याची ट्विटरची मागणी

रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडावी, यासाठी मस्क यांच्यातर्फे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप ट्विटरकडून न्यायालयात जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांतून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी सप्टेंबरमध्येच घेण्यात यावी अशी मागणी ट्विटरतर्फे करण्यात आली आहे. मस्क यांच्याद्वारे जे आरोप लावण्यात आले आहेत, त्यामुळे ट्विटरच्या लाखो शेअर्सचे भविष्य धोक्यात आहे. सप्टेंबरमध्ये सुनावणी सुरू न झाल्यास कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी, असे ट्विटरतर्फे नमूद करण्यात आले आहे. तर याप्रकरणाची सुनावणी फेब्रुवारी 2023 मध्ये सुरु करावी अशी मागणी एलन मस्क यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

44 बिलियन डॉलरचा करार रद्द

एलन मस्क यांनी 14 एप्रिल रोजी ट्विटरसोबत झालेल्या कराराबाबत घोषणा केली होती. 44 बिलियन डॉलरमध्ये हा व्यवहार झाल्याचे मस्क यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी संवादही साधला होता. मात्र काही काळापासून मस्क आणि ट्विटर यांच्यादरम्यान वाद सुरू होता. अखेर 8 जुलै रोजी मस्क यांनी ट्विटरसोबत केलेला 44 बिलियन डॉलरचा करार रद्द करत असल्याची घोषणा केली. एलन मस्क यांनी हा निर्णय का घेतला याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र ट्विटरवर किती फेक खाती आहेत, याची अचूक माहिती कंपनीला देता न आल्याने तसेच या करारदरम्यान ज्या अटी घालण्यात आल्या होत्या, त्यांचे उल्लंघन झाल्याने मस्क यांनी हा करार रद्द केल्याची चर्चा आहे. त्यानंतर ट्विटरने मस्क यांना कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला. ‘आम्हाला हा करार पूर्ण करायचा आहे. हा करार फायनल करताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्यानुसार ठरलेली किंमत देऊन एलन मस्क यांना हा करार पूर्ण करावाच लागेल. आणि यासाठी आम्ही मस्क यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करु’ असे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट लेअर यांनी म्हटले होते. न्यायालयात आम्ही हा दावा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.