लाल किल्ल्यावर ते विजय चौक भाजप खासदारांनी तिरंगा बाइक रॅली, 11 ते 13 ऑगस्टमध्ये प्रभातफेरी काढणार

लाल किल्ल्यावर ते विजय चौक भाजप खासदारांनी तिरंगा बाइक रॅली

लाल किल्ल्यावर ते विजय चौक भाजप खासदारांनी तिरंगा बाइक रॅली, 11 ते 13 ऑगस्टमध्ये प्रभातफेरी काढणार
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 1:21 PM

नवी दिल्ली : देश यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अंतर्गत देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदारांनी लाल किल्ला (Red Fort) ते विजय चौक (Vijay Chowk) अशी तिरंगा बाइक रॅली (BJP MP Tiranga Bike Rally) काढली. यावेळी हातात तिरंगा घेऊन या खासदारांनी भारत माता की जय!, जय हिंद, जय भारतच्या घोषणा दिल्या. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू , केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक घराघरात तिरंगा मोहिमेअंतर्गत असे आवाहन करण्यात आले. त्याचवेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, पक्षाचे नेते 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान बूथ स्तरावर प्रभातफेरी काढतील आणि यादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनांपैकी एक रघुपती राघव राजा राम, आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम गायले जाईल, अशी माहिती आहे.

संसदीय पक्षाच्या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमांबद्दल देखील चर्चा केली. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर जोर देऊन त्यांनी भाजप खासदारांना आपापल्या लोकसभा मतदारसंघातील लोकांना जोडण्याचे आवाहन केले होते. नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांना सकाळी 9 ते 11 या वेळेत प्रभातफेरी आणि हर घर तिरंगा मोहिमेला लोकप्रिय करण्यासाठी पक्षाच्या युवा आघाडीच्या नेत्यांनी दुचाकीवरून तिरंगा यात्रा काढण्याची मोहिम आखली.

सांस्कृतिक मंत्रालयाने बुधवारी खासदारांसाठी तिरंगा बाइक रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीला सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केलं. पण या रॅलीत विरोधीपक्षाचा एकही खासदार उपस्थित राहिला नाही, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

प्रभातफेरीचं आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक घराघरात तिरंगा मोहिमेअंतर्गत असे आवाहन करण्यात आले. त्याचवेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, पक्षाचे नेते 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान बूथ स्तरावर प्रभातफेरी काढतील आणि यादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनांपैकी एक रघुपती राघव राजा राम, आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम गायले जाईल. आपल्या भाषणात नड्डा यांनी खासदारांना या कार्यक्रमांदरम्यान त्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यास सांगितले होते आणि त्यांना त्या बूथवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते जेथे भाजपने गेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.