AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Bomb Blast News: स्फोटातील ती i-20 कार कोणाची?; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा मोठा दावा

Delhi Bomb Blast News: दिल्ली येथील लाल किल्ला येथील स्फोटात वापरलेली i-20 कार ही पुलवामा येथील अमीर उमरच्या घरातील असल्याचे समोर आले होते. पण आता अमीर उमरच्या कुटुंबीयांनी वर दिलेली प्रतिक्रिया धक्कादायक आहे.

Delhi Bomb Blast News: स्फोटातील ती i-20 कार कोणाची?; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा मोठा दावा
I-20 carImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 11, 2025 | 1:14 PM
Share

दिल्लीमधील लाल किल्ला येथे 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटोना संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटोबाबत i-20 कारचा वापर करण्यात आला होता. या कारमध्ये 9 जण होते. स्फोट झाल्यानंतर या गाडीत बसलेल्या 9 जणांच्या शरीरीचे तुकडेही दूरवर उडाले. त्यानंतर ही गाडी कोणाची होती याचा तपास सुरु झाला. समोर आलेल्या माहितीत, ही i-20 कार काश्मीरमधील पुलवामा येथील मोहम्मद उमर या व्यक्तीच्या नावावर होती. आता मोहम्मद उमर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी खळबळजनक खुलासा केला आहे.

उमरच्या कुटुंबीयांचा खळबळजनक खुलासा

दिल्ली स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या i-20 कारचा चालक मोहम्मद उमरच्या कुटुंबीयांनी मोठा दावा केला आहे. ही कार त्यांची नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, त्यांची मुले कधीही दिल्लीला गेली नाहीत असे देखील म्हटले आहे. “घटनेत वापरलेली कार आमची नाही. आमची कार अजूनही घराबाहेर उभी आहे. हरियाणा पासिंग नंबरची कोणतीही गाडी आमच्याकडे नाही. आमची मुले कधीच दिल्लीत गेली नाहीत. उमर हा पुलवामामध्येच प्लंबिंगचं काम करतो,” असे उमरच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ही i-20 कार काश्मीरमधील पुलवामा येथे राहणाऱ्या मोहम्मद उमर या व्यक्तीच्या नावावर होती. या कारमध्ये अमोनियम नायट्रेटसारखी शक्तिशाली स्फोटके असल्याचे आढळले. सुरक्षायंत्रणांना या स्फोटाचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आला आहे. मोहम्मद उमर हा फरीदाबादच्या सारंगपूर स्फोट प्रकरणाशीही संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दिल्ली पोलिस आणि एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) या दोन्ही संस्था आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

i-20 कारबाबत

समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोटात वापरण्यात आलेली i-20 कार ही आधी दुसऱ्या मालकाची होती. 2014मध्ये ही कार सलमान नावाच्या व्यक्तीने खरेदी केली होती. त्यानंतर त्याने ही कार ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीने विकत घेतली. देवेंद्रने ती अंबालातील आणखी एका व्यक्तीला विकली. अखेरीस ही कार जम्मू-काश्मीरमधील तारिक नावाच्या व्यक्तीकडे पोहोचली. शेवटी या कारचा मालक पुलवामा येथील उमर असल्यातचे समोर आले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.