तरुणाने रोड शो चालू असताना गाडीवर चढून केजरीवालांच्या कानशिलात लगावली

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झालाय. नवी दिल्ली मतदारसंघातील मोती नगरमध्ये रोड शो सुरु असताना एका तरुणाने ओपन जीपमध्ये चढून केजरीवालांच्या कानशिलात लगावली. यानंतर अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. हा तरुण दिल्लीतील 33 वर्षीय स्पेअर पार्ट विक्रेता असल्याचं बोललं जातंय. सोशल मीडियावर […]

तरुणाने रोड शो चालू असताना गाडीवर चढून केजरीवालांच्या कानशिलात लगावली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झालाय. नवी दिल्ली मतदारसंघातील मोती नगरमध्ये रोड शो सुरु असताना एका तरुणाने ओपन जीपमध्ये चढून केजरीवालांच्या कानशिलात लगावली. यानंतर अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. हा तरुण दिल्लीतील 33 वर्षीय स्पेअर पार्ट विक्रेता असल्याचं बोललं जातंय.

सोशल मीडियावर नेहमीच टीकेचे धनी होणाऱ्या केजरीवालांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्ये असाच एक प्रकार घडला होता. दिल्लीतील दक्षिणपुरी भागात रोड शो सुरु असताना एक तरुण ओपन जीपवर चढला आणि त्याने केजरीवालांनी हल्ला केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवालांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

VIDEO : व्हिडीओ पाहा

या हल्ल्यानंतर भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी थेट भाजपवर आरोप करत, केजरीवालांचा जीव घ्यायचाय का, असा सवाल केलाय. शिवाय केजरीवालांच्या सुरक्षेत ही गंभीर चूक असल्याचंही आम आदमी पार्टीने म्हटलंय. तर केजरीवाल अशा प्रकारचे हल्ले स्वतःच घडवून आणतात, असा पलटवार भाजपचे प्रवक्ते जफर इस्लाम यांनी केला.

केजरीवालांवरील आतापर्यंतचे हल्ले

2014 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान एका रिक्षा चालकाने केजरीवाल यांच्यावर हल्ला करत कानशिलात लगावली.

27 डिसेंबर 2014 रोजी दिल्लीमधील एका रॅलीमध्ये केजरीवाल यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये ते जखमी झाले.

2014 मध्येच त्यांच्यावर अंडीही फेकण्यात आली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.