Delhi BMW Accident : पप्पा वाचले असते…AIIMS जवळ असताना 19 km लांब का घेऊन गेले, अर्थ खात्याच्या डेप्युटी डायरेक्टरचा BMW Accident मध्ये मृत्यू
Navjot Singh Death :भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी पदावर असलेले नवजोत सिंह यांचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीची हालत गंभीर आहे. नेमकं काय घडलं? आता प्रत्यक्षदर्शीनी त्यावर प्रकाश टाकला आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये धौला कुआं भागात शनिवारी एक भीषण अपघात झाला. यात भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी पदावर असलेले नवजोत सिंह यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली. हा अपघात मेट्रो पिलर नंबर 57 जवळ झाला. नवजोत सिंह आणि त्यांची पत्नी बंगला साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेऊन मोटरसायकलवरुन घरी परतत होते, त्यावेळी हा अपघात झाला. हा अपघात ज्यावेळी झाला, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, BMW कार एक महिला चालवत होती. तिच्यासोबत तिचा नवरा सुद्धा होता. BMW कारने त्यांच्या बाइकला धडक दिली. बाईक आधी डिवायडरला धडकली, नंतर बसला जाऊन धडकली. या अपघातात अधिकारी नवजोत सिंह आणि त्यांची पत्नी जखमी होऊन रस्त्यावर पडले.
अधिकाऱ्याच्या बाइकला धडक देणाऱ्या BMW कारमधील महिला आणि तिच्या पतीने घटनास्थळी टॅक्सी बोलावली. त्यांना घेऊन ते रुग्णालयात गेले. पण नवजोत सिंह यांना वाचवता आलं नाही. त्यांच्या पत्नीची हालत गंभीर आहे. अपघातानंतर नवजोत यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी 19 किलोमीटर लांब जीटीबी नगरमधील न्यूलाईफ रुग्णालयात का घेऊन गेले? असा नवजोत यांच्या कुटुंबाचा आरोप आहे. तिथे आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पत्नीची हालत नाजूक आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पप्पांचे प्राण वाचले असते. AIIMS-सफदरजंग ही हॉस्पिटल जवळ असताना 19 किमी लांबच्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेले. डेप्युटी डायरेक्टरच्या मुलाने विचारला प्रश्न.
क्राइम टीम आणि FSL टीम घटनास्थळी
पोलिसांनी सांगितलं की, मृत नवजोत सिंह दिल्लीच्या हरिनगर येथे रहायचे. अर्थ मंत्रालयात नॉर्थ ब्लॉकमध्ये ते डेप्युटी सेक्रेटरी म्हणून तैनात होते. पोलिसांनी BMW कार जप्त केली आहे. क्राइम टीम आणि FSL टीमने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी जोडपं गुरग्राम येथे राहणार आहे. अपघातात ते सुद्धा जखमी झाले असून रुग्णालयात दाखल आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या जबानीच्या आधारावर तपास करत आहेत. भारत सरकारमधील एका बड्या अधिकाऱ्यांचा रस्ते अपघातात अशा प्रकारे मृत्यू होणंं दुर्देवी आहे.
