मुस्लिम मते कुणाच्या पारड्यात? तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्नावर पॉकेट एरियात कसे फेरले पाणी, भाजपाने कशी घेतली आघाडी
Muslim Voters Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लिम मतदार कुणाच्या बाजूने आहे, याची मोठी चर्चा या निवडणुकीत रंगली होती. तर मुस्लिमांनी या निवडणुकीत आपची बाजू घेतली की भाजपाची कड घेतली याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये भाजपाने 27 वर्षानंतर मोठी मुसंडी मारली. आपच्या झाडूला धूळ चाटवली. अरविंद केजरीवाल यांचे स्वप्न धुळीस मिळवले. या निवडणुकीत मुस्लिम मतदारांवर आपची मोठी भिस्त होती. मुस्लिम मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी आपने अनेक घोषणा केल्या होत्या. तर अवैध रोहिंग्या आणि बांगलादेशांची घुसखोरी दिल्लीत वाढल्याचा आरोप भाजपाने सातत्याने केला होता. वोट बँक पक्की करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण निकाल पाहता आपला मुस्लिम मतदारांनी पण हात दाखवल्याचे चित्र समोर येत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 चे निकाल सकाळपासूनच हाती यायला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत 70 जागांवर आप, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, एआयएमआयएम आणि इतर पक्षांनी नशीब आजमावलं. दिल्लीत जवळपास 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. आतापर्यंत पाच जागांवर मुस्लिम उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे. यापूर्वी आपचा वरचष्मा असलेल्या मुस्लिम बहुल भागात यावेळी भाजपाने सुरूंग लावल्याचे दिसून येत आहे.
या भागात जादा मतदान




दिल्लीतील मुस्लिम बहुल भागात सर्वाधिक मतदान झाले होते. त्यामुळे आपला आपला विजय निश्चित मानण्यात येत होता. पण जे कल येत आहे, त्यात भाजपा आघाडीवर असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. मुस्तफाबाद, बल्लीमारान, सीलमपुर, मटिया महल, चांदणी चौक आणि ओखला या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा दिसत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यापूर्वीच्या इतर राज्यांच्या निवडणुकीत सुद्धा मुस्लिम मतदार, विशेषतः महिला मतदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान केल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यापूर्वी यासर्व मतदारसंघात भाजपासोडून इतर पक्षाचे मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत.
मुस्तफाबाद मतदारसंघात AIMIM चे ताहिर हुसैन, आम आदमी पक्षाचे आदिल खान, काँग्रेसचे अली मेंहदी आणि भाजपाकडून मोहन सिंह बिष्ट निवडणूक लढवत आहेत. बल्लीमारान मतदारसंघात आम आदमी पक्षाचे इमरान हुसैन, काँग्रेसचे हारून यूसुफ आणि भाजपाकडून कमल बांगड़ी निवडणूक लढवत आहेत. मटिया महल विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे मोहम्मद इकबाल आणि काँग्रेसचे आसिम मोहम्मद खान तर भाजपाकून दीप्ति इंदौरा निवडणूक लढवत आहेत. या प्रमुख मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात समोर येतील. त्यानंतर मुस्लीम मतदारांची भूमिका स्पष्ट होईल.