Delhi Election Result 2025 : दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? भाजपात या 3 नावाची जोरदार चर्चा, कुणाच्या डोक्यावर असेल विजयाचा फेटा?
BJP Delhi CM : दिल्लीत भाजपाचं कमळ फुलले आहे. दिल्लीत भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपाने जल्लोष सुरू केला आहे. तर अरविंद केजरीवाल यांची बैठक सुरू आहे. दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीत भाजपाचे कमळ फुलले आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपाने 42 जागांवर मुसंडी मारली. तर आपला 28 ठिकाणी आघाडी आहे. काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही. 27 वर्षानंतर भाजपा दिल्लीत सत्तेवर आली आहे. यापूर्वी सुषमा स्वराज या भाजपाच्या अखेरच्या मुख्यमंत्री होत्या. त्या केवळ 52 दिवसच मुख्यमंत्री पदावर होत्या. आता भाजपाने दिल्लीत करिष्मा दाखवल्यानंतर दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेता, गायक मनोज तिवारी
दिल्लीत भाजपाने सत्ता काबीज केल्यावर सर्वात अगोदर जे नाव समोर येत आहे, ते अभिनेता, गायक आणि खासदार मनोज तिवारी यांचे आहे. ते भाजपाचे माजी अध्यक्ष पण होते. दिल्लीत भाजपाच्या बाजूने मतदार वळवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. जो पण दिल्लीचा मुख्यमंत्री होईल, तो विकास करेल, असे वक्तव्य त्यांनी केले.




विजेंदर गुप्ता हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार
दिल्लीतील रोहणी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि आमदार विजेंद्रर गुप्ता यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. भाजपाचे धाकड नेते, आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आम आदमी पक्षाविरोधात विरोधकांची भक्कम बाजू त्यांनी मांडली. सुरुवातीच्या ज्या प्रतिक्रिया आल्यात त्यात अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे नाव घेतले आहे. भाजपाच्या या विजयात त्यांचे मोठे योगदान मानण्यात येत आहे.
वीरेंद्र सचदेवा यांचे नाव पण स्पर्धेत
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी भाजपासाठी येथे मोठी कसरत केली. त्यांनी संघटनेवर विशेष लक्ष दिले. दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. दिल्लीत भाजपाची सत्ता आल्यावर वीरेंद्र सचदेवा यांचे नाव पण स्पर्धेत आहे. ते पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात.
नुपूर शर्मा यांच्या नावाची चर्चा
दिल्लीत शीला दीक्षित, सुषमा स्वराज, आतिषी या महिला मुख्यमंत्री होत्या. पुन्हा महिला मुख्यमंत्री देण्याचे ठरल्यास भाजपात नुपूर शर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. त्या हिंदू चेहरा पण सोशल मीडियात अधिक लोकप्रिय आहेत. अर्थात दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्ष ठरवतील.