AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Fire : केंद्राकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत, दिल्लीतल्या आगीत 27 मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भिती कायम

अग्निशमन दलाचे (Fire Brigade) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, इमारतीत अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बचावकार्यासाठी आम्ही 100 कर्मचाऱ्यांची टीमही तैनात केली आहे.

Delhi Fire : केंद्राकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत, दिल्लीतल्या आगीत 27 मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भिती कायम
केंद्राकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदतImage Credit source: tv9
| Updated on: May 13, 2022 | 11:49 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीतील मुंडका इमारतीला शुक्रवारी भीषण आग (Delhi Fire) लागली. या भीषण आगेने देशाला हादरवून सोडले आहे. कारण या आगीत 27 जणांचा (27 Death In Delhi Fire) मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाकांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अग्निशमन दलाचे (Fire Brigade) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, इमारतीत अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बचावकार्यासाठी आम्ही 100 कर्मचाऱ्यांची टीमही तैनात केली आहे. सध्या अग्निशमन विभागाचे पथक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शोधमोहीम राबवत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अशीही माहिती दिली आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाकांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

एनडीआरएफची मदत पोहोचणार

दिल्लीतील मुंडका येथील आगीची घटना अत्यंत दुःखद आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. एनडीआरएफही लवकरच तेथे पोहोचणार आहे. लोकांना बाहेर काढणे आणि जखमींना तत्काळ उपचार देणे हे आमचे प्राधान्य आहे,” असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

अमित शाह यांचं ट्विट

राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला

दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळ लागलेल्या आगीत झालेल्या दुर्घटनेने दुःखी झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत मनापासून संवेदना आणि जखमींनी लवकरात लवकर बरे होवो ही प्रार्थना. असे ट्विट राहुल गांधी यांनी करत शोक व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांचं ट्विट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.