AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या जंतरमंतरवर पुन्हा गोंधळ; दगडफेकीनंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या

दिल्लीच्या जंतरमंतरवर पुन्हा गोंधळ झाला आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्याही फेकल्या.

दिल्लीच्या जंतरमंतरवर पुन्हा गोंधळ; दगडफेकीनंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
| Updated on: Jul 25, 2026 | 7:22 PM
Share

नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठी बातमी हाती आली आहे. कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनाला बसलेल्या जंतर-मंतर परिसरात पुन्हा गोंधळ झाला आहे. जंतरमंतर परिसरात दगडफेक झाली आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनीही आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. लाठीचार्जनंतर आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्याही फेकल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सीजेपीच्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटीवरून बिहारमध्ये वातावरण तापलं आहे. बिहारमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केली आहे. बिहारच्या पटना, छपरानंतर आता जंतरमंतरमध्येही मोठा गोंधळ झाला. आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. त्यानंतर या परिसरात दगडफेक झाली. या दगडफेकीनंतर आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तातडीने आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांची एकच धावाधाव झाली. या घटनेनंतर पोलिसांनी बंदोबस्त आणखी कडक केला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. या दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसहित आंदोलक देखील जखमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दगडफेकीनंतर पोलिसांची देखील धावाधाव झाली. दगडफेकीमुळे पोलीस सैरावैरा पळत असल्याचेही व्हिडिओतून समोर आलं आहे.

बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

बिहारमध्ये शनिवारी झालेल्या आंदोलनला हिंसक वळण लागलं. या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. रस्त्यावर हिंसाचारादरम्यान गोळीबाराची घटना घडली. समोरून गोळीबार झाल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या गोळीबारात 3 युवक जखमी झाले. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसहित 25 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी गोळीबाराच्या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांनी एके-47 बंदुकीने गोळीबार केल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक उपचारानंतर पटना येथे हलविण्यात आलं आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच