Delhi Red Fort Blast Video : दिल्ली स्फोटाचा हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर, कॅमेऱ्यात सगळं लाईव्ह कैद!
दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात डॉ. उमर याचे नाव येत आहे. दरम्यान, या स्फोटाचा एक हादरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत लोक सैरावैरा पळत असल्याचे दिसत आहे.

Delhi Red Fort Car Blast : राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण कार स्फोटानंतर देश हादरला आहे. या स्फोटात एूण 9 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. निरापराध लोकांना यात जीव गमवावा लागल्याने देशभरात संताप व्यक्त केला जातोय. हा स्फोट आय-20 कारमध्ये झाला असून या प्रकरणात डॉ. उमर या व्यक्तीचे नाव आले आहे. त्याने हा आत्मघातकी स्फोट घडवून आणल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता हा स्फोट नेमका कसा झाला? त्याची तीव्रता किती होती? हे सतत विचारले जात होते. याच स्फोटाचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यूट्यूबच्या कॅमेऱ्यात हा प्रसंग कैद झाला आहे.
स्फोटाचा व्हिडीओ व्हायरल
लाल किल्ला परिसरातील स्फोटाचे अनेक धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातीलच एक व्हिडीओ सध्या फारच चर्चेत आला आहे. एक यूट्यूबर लोकांची मुलाखत घेत असतानाच अचानक स्फोट झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्फोटाची ही दृश्य या यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून यात स्फोटानंतर लोक सैरावैरा पळत असल्याचे दिसत आहे.
व्हिडीओत नेमके काय आहे?
सध्या समोर आलेला हा व्हिडीओ स्फोट झालेल्या परिसरातीलच असल्याचे बोलले जात आहे. स्फोटाचा हा सर्व प्रकार या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत एक यूट्यूबर दिसत आहे. यूट्यूबरच्या हातात एक माईक दिसत आहे. तर समोरची व्यक्ती माईकवर बोलताना दिसतेय. त्याच वेळी अचानकपणे स्फोट झाल्याचा जोराचा आवाज आल्याचे दिसत आहे. हा आवाज येताच मुलाखत देणारी व्यक्ती फारच घाबरली आहे. त्यानंर यूट्यूबरही घाबरला असून क्षणात लोक सैरावैरा पळत सुटलेले दिसत आहेत. अवघ्या काही सेकंदात हा स्फोट झाला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे.
Trigger warning : Disturbing content ⚠️
लाल क़िले पर हुए धमाके की आवाज और उसका झटका एक यूट्यूब चैनल के वीडियो में देखा जा सकता है।
इस वीडियो में एक व्यक्ति बातचीत कर रहा था- तभी धमाके की आवाज सुनाई दी।
— Govind Pratap Singh | GPS (@govindprataps12) November 10, 2025
दरम्यान, या हल्ल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आहेत. डॉ. उमर याने हा आत्मघातकी हल्ला घडवून आणल्याचे बोलले जात आहे. आता त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. तसेच स्फोट झालेल्या आय-20 कारच्या तपासातून काही सुगावा लागतो का? याचाही शोध घेतला जात आहे. स्फोटाच्या अगोदर तीन ते चार तास ही कार एका जागेवर उभी होती. त्यानंतर सिग्नलजवळ पोहोचल्यानंतर या कारचा स्फोट झाला. आता या प्रकरणात आणखी कोण-कोणते खुलासे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
