Delhi Blast : अमोनियम नायट्रेट, 5 डॉक्टर्सचा खतरनाक प्लॅन…दिल्लीला हादरवणारी ‘डी गँग’
Delhi Blast D Gang : दिल्लीतील स्फोटाप्रकरणी 5 डॉक्टरांची नावं समोर येत आहेत. यामध्ये त्याचाही सहभाग आहे, जो त्या कारमध्ये होता. त्याचे नाव डॉ. उमर असे होते. तोच या कटाचा मास्टरमाईंड असल्याचे बोलले जाते. याशिवाय डॉ. मुजम्मील शकील आणि डॉ. आदिल यांनाही अटक करण्यात आलेली आहे.

Lal Kila Blast D Gang : देशाची राजधआनी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात काल जोरदार धमाका झाला. त्यात आता मृतांचा आकडा 12 वर पोहचला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये धमाका, स्फोट झाला. त्यात डॉक्टर उमर नबी हा होता. तो फरीदाबाद येथील अल फलाह मेडिकल विद्यालयात नोकरी करतो. काही दिवसांपूर्वीच अल फलाह विद्यापीठातील डॉ. मुजम्मिल शकील याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्या खोलीतून अमोनियम नायट्रेट, एक एके-47 रायफल दारुगोळा जप्त केला होता.
दिल्ली स्फोटात केवळ डॉक्टर उमर आणि डॉ. मुजम्मिल यांचेच नाव आहे असे नाही तर दहशतवादी नेटवर्कमध्ये अनेक डॉक्टर्सचा समावेश असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामध्ये डॉक्टर शाहीन, डॉक्टर आदिल आणि डॉक्टर मोहिउद्दीन यांचाही समावेश उघड झाला आहे. तर पाच डॉक्टरांची गँग या ब्लास्टमागे असल्याचे समजते.
कोन आहे डॉक्टर मुजम्मिल?
जम्मू काश्मीर पोलिस आणि फरीदाबाद पोलीस यांच्या संयुक्त तपासात काही दिवसांपूर्वी डॉक्टर मुजम्मिल याला अटक करण्यात आली होती. तो वरिष्ठ डॉक्टर आहे. फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाच्या परिसरातच तो राहतो. तो गेल्या साडे तीन वर्षांपासून या विद्यापीठाच्या परिसरात राहतो.
पोलिसांनी त्याच्या खोलीतून जवळपास 360 किलो अमोनियम नायट्रेट जप्त केले. मुजम्मिल याने धौज या गावात एक खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांच्या सूत्रानुसार, जवळपास 15 दिवस अगोदर अमोनियम नायट्रेट डॉक्टर मुजम्मिलपर्यंत पोहचले होते. अमोनियम नायट्रेट तो आठ मोठ्या सुटकेस आणि चार छोट्या सुटकेसमध्ये लपवून ठेवत होता.
डॉ. आदिलचे कारनामे
डॉक्टर आदिल अहमद राठर हा उत्तरप्रदेशातील सहारनपूरमध्ये काम करत होता. श्रीनगर पोलिसांनी त्याला जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर लावल्याने अटक केली होती. या क्षेत्रात या पोस्टरमुळे तणाव वाढला होता. पोलिसांनी तपासाअंती डॉ. आदिलची ओळख पटवली आणि त्याला अंबाला रोडवरील एका रुग्णालायतून अटक केली. आदिल हा मुळचा जम्मू-काश्मीरमधील अनंतनागचा रहिवाशी आहे. 4 ऑक्टोबर रोजीच त्याने इथल्या एका डॉक्टर महिलेशी निकाह, लग्न केले आहे.

लखनऊमध्ये महिला डॉक्टरला अटक
डॉक्टर आदिल याच्याशिवाय लखनऊ येथील डॉक्टर शाहीन शाहिद हिला तपास यंत्रणांनी अटक केली. ती शाहीन मुजम्मिलची निकटवर्तीय मानण्यात येते. मुजम्मिल आणि शाहीन शाहिद अनेकदा एकाच कारमधून फिरताना कित्येकदा दिसले आहे. शाहीन शाहिदच्या कारमधून पोलिसांनी शस्त्रही जप्त केली आहेत.
ATS ने डॉक्टर मोहिउद्दीनला केली अटक
तर अहमदाबादमधील गुजरात ATS ने एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. त्यानुसार या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड हा कोणी दहशतवादी नाही तर एक डॉक्टर आहे. डॉ अहमद मोहिउद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याने चीनमधून MBBS पूर्ण केले आणि तो
इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्सच्या संपर्कात होता. डॉ. मोहिउद्दीनने एरंडी तेलाच्या मदतीने रायसिन हे विष तयार करण्याचा प्रयोग सुरु केला होता.
