Delhi Blast: हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा कुणाला थेट इशारा? ऑपरेशन सिंदूरविषयी पाकमध्ये चर्चांना उधाण
Rajnath Singh on Lal Kila Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाप्रकरणात अनेकानेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भूतान दौऱ्यावर आहेत. ते परत आल्यावर एक महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडणार आहे. त्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठा इशारा दिला आहे.

Minister Rajnath Singh Warns : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाप्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भूतान देशाच्या दौऱ्यावर आहेत. ते देशात परतल्यावर दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीकडे भारतीय प्रसार माध्यमांचेच नाही तर पाकिस्तानमधील मीडियाचे सुद्धा लक्ष लागले आहे. तर या स्फोटानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या स्फोटाशी संबंधित कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. त्यामुळे हा पाकिस्तानाला थेट इशारा आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही
फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलवर राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला. दोषींना शिक्षा मिळणारच असे त्यांनी ठणकावले.दिल्ली बॉम्बस्फोटाचा कसून आणि वेगाने तपास सुरु असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे नाव सातत्याने समोर येत असल्याने भारत-पाकिस्तानमध्ये संघर्षाची ठिणगी पडणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक
तर कार आय-20 तील स्फोटाप्रकरणी आता अजून एक अपडेट समोर येत आहे. उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या भूतान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर उद्या दिल्लीत स्फोटाप्रकरणी महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले आहे.
सध्या गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
तर लाल चौकातील स्फोटानंतर दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे. यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. लाल चौकातील स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीला दिल्लीचे पोलीस आयुक्त, आयबी प्रमुख, एनआयएचे प्रमुख, इतर तपास यंत्रणांचे वरिष्ठ आणि गृहमंत्रालयातील सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी हे ऑनलाईन उपस्थित आहेत.
हा आत्मघातकी हल्ला?
प्राथमिक तपासानुसार हा आत्मघातकी हल्ला असण्याची शक्यता बळावली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद मॉड्यूल उघड केल्याने दहशतवादी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली होती. 30 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी पहिल्यांदा छापेमारी केली. त्यानंतर गेल्या दीड आठवड्यात या नेटवर्कमधील एक दोन जणांची धरपकड झाली. आपले बिंग फुटणार या भीतीने एका दहशतवाद्याने लाल चौकाजवळ कारमध्ये हा स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. देशातील अनेक ठिकाणी मोठा स्फोट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना देशविघातक हल्ला करता आला नाही.
