Delhi Sainik School: मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतला महत्वाचा निर्णय, शहीद भगत सिंह यांच्या नावाने उभारण्यात येईल सैनिक स्कूल!

23 मार्च रोजी शहीद भगत सिंह यांचा शहीद दिवस असतो. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी भगत सिंह यांच्या स्मृतीस दिवसानिमित्त 23 मार्च रोजी पंजाबमध्ये सुट्टी घोषित केली आहे. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी देखील म्हटले की ,दिल्ली सरकार लवकरच येणाऱ्या काही दिवसात सैनिक स्कूल उघडणार आहे, ज्याचे नाव शहीद भगत सिंह ठेवले जाईल.

Delhi Sainik School: मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतला महत्वाचा निर्णय, शहीद भगत सिंह यांच्या नावाने उभारण्यात येईल सैनिक स्कूल!
भगवंत मानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 9:52 PM

Delhi Sainik School: 23 मार्च रोजी शहीद भगत सिंह यांचा शहीद दिवस असतो. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी भगत सिंह यांच्या स्मृतीस दिवसानिमित्त 23 मार्च रोजी पंजाबमध्ये सुट्टी घोषित केली आहे. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी देखील म्हटले की ,दिल्ली सरकार लवकरच येणाऱ्या काही दिवसात सैनिक स्कूल उघडणार आहे, ज्याचे नाव शहीद भगत सिंह ठेवले जाईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारच्या दिवशी आयोजित केलेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये याबद्दल सांगितले. मुख्यमंत्री केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी सांगितले की,उद्या शहीद-ए-आजम भगत सिंह यांचा स्मृती दिवस म्हणजेच शहीद दिवस (Martyrdom Day March 23) आहे. गेल्या वर्षी आम्ही लोकांना आश्वासन दिले होते की, लवकरच दिल्लीमध्ये असे मिलिटरी स्कूल बनेल. जेथे मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण देण्यात येईल.

महत्वाचा निर्णय

दिल्ली चे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शहीद-ए-आजम भगत सिंह (Bhagat Singh) यांच्या शहीद दिवस आधी एक मोठी घोषणा केली. त्यांनी भगत सिंह यांच्या नावावर दिल्लीमध्ये एक सैनिक स्कूलची निर्मिती केली जाईल याबद्दलची घोषणा केली. हे स्कूल पूर्णपणे मोफत असेल आणि त्याचबरोबर येथे विद्यार्थ्यांना राहण्याची सोय देखील केली जाईल. या शाळेमध्ये सेनाचे रिटायर्ड ऑफिसर विद्यार्थ्यांना सैन्यामध्ये भरती होण्यासाठी ट्रेनिंग देतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, हे असे सैनिक स्कूल असेल जिथे वेगवेगळ्या लष्करामध्ये जाण्यासाठी आवश्यक दिली जाणारी ट्रेनिंग विद्यार्थ्यांना पुरवली जाईल त्याचबरोबर एकंदरीत या शाळेमध्ये 100- 100 विद्यार्थ्यांची बॅच असेल आतापर्यंत या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी 18000 अर्ज आले आहेत.

14 एकर जागेव स्कूल

दिल्ली सरकार सैनिक शाळेसाठी झरोदा कलां मध्ये 14 एकर जागेवर ‘शहीद भगत सिंह आर्म्ड फोर्सेज प्रिपरेटरी स्कूल’ बनवत आहे. येथे विद्यार्थ्यांना सशस्त्र बळासाठी आवश्यक असणारे शिक्षण पुरवले जाईल. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल त्याच बरोबर मुले आणि मुलींसाठी वेगवेगळे हॉस्टेलची उभारणी देखील केली जाईल.

पंजाब मध्ये दिली गेली सुट्टी

भगत सिंह यांच्या स्मृति दिनानिमित्त पूर्ण पंजाब मध्ये सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे. यापूर्वी फक्त पंजाब मधील नवांशहर येथे शहीद दिवस निम्मित सुट्टी दिली जायची परंतु भगवंत मान यांच्या सरकार ने शहीद दिवस निम्मित नवीन परंपरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या

काश्मिरमधील नागरिकांसमोर आम्ही अपयशी ठरलो; OIC परिषदेत इम्रान खान यांनी गायिले काश्मिरचे गोडवे

Hingoli | बिस्कीट देण्याच्या बहाण्यानं चिमुरडीसोबत लज्जास्पद कृत्य! गुन्हा दाखल, पण आरोपी मोकाट

ST संपावर तोडगा काढण्यात विलंब का? कोर्टाचा सरकारला सवाल

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.