AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Noida Twin Tower Demolition | काऊंटडाऊन सुरू, पत्त्यांच्या बंगल्यागत कोसळणार 32 मजली ट्विन टॉवर्स, 984 फूट धुळीचे लोट, 5 हजार लोकांचं स्थलांतर, दिल्लीचे 10 मुद्दे महत्त्वाचे!

ट्विन टॉवर पाडण्याताना कुणीही खिडकीतून, गॅलरीतून किंवा घराच्या छतावर येऊन चित्रीकरण करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Noida Twin Tower Demolition | काऊंटडाऊन सुरू, पत्त्यांच्या बंगल्यागत कोसळणार 32 मजली ट्विन टॉवर्स, 984 फूट धुळीचे लोट, 5 हजार लोकांचं स्थलांतर, दिल्लीचे 10 मुद्दे महत्त्वाचे!
दिल्लीतील ट्विन टॉवर पाडण्याची तयारी जवळपास पूर्ण Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2022 | 6:15 AM
Share

नवी दिल्लीः नोएडा येथील सुपरटेक बिल्डर्सने (Noida Supertech Builders) बांधलेल्या अत्युच्च ट्विन टॉवर्स (Delhi Twin Towers) पाडण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अनियमित बांधकामामुळे हे टॉवर्स पाडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme court) दिले आहेत. आज रविवारी दुपारी 2.30 वाजता हायटेक तंत्रज्ञानाच्या मदतीने 32 मजली ट्विन टॉवर जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या इमारती पाडण्यासाठी दिल्ली प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. कारण अगदी भर वसतीत या इमारती आहेत. त्यामुळे इमारती जमीनदोस्त होताना आजूबाजूच्या इमारतींनाही धोका संभावू शकतो. खबरदारी म्हणून दिल्ली प्रशासानाच्या वतीने आजूबाजूच्या नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढच नाही तर आपले पाळीव प्राणीदेखील घरात ठेवू नका असे सांगण्यात आले आहे. प्रशासनाने रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनाही या परिसरातून हलवलं आहे. देशात प्रथमच एवढ्या उंच इमारती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाडल्या जाणार आहेत, त्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे, यावर एक प्रकाशझोत-

  1. दिल्लीतील हे सुपरटेक ट्विन टॉवर्स रविवारी ठिक 2.30वाजता स्फोटकांच्या मदतीने उध्वस्त केले जातील. यासाठी डिटोनेटर्सची मदत घेतली जातेय.
  2.  एडिफाइस इंजिनिअरिंग ही फर्मकडे हे पाडापाडीचं काम देण्यात आलंय. इमारती पाडण्यासाठी 3500 किलो स्फोटकं वापरली जातील. जवळपास 9640 ठिकाणी इमारतींमध्ये ही स्फोटकं पेरली गेली आहेत.
  3.  दिल्लीतील नोएडा सेक्टर 93 मधील अॅपेक्स आणि सेयान असं या दोन इमारती पाडल्या जातील. यापूर्वी परिसरातील एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज सोसायटीतील जवळपास 5000 नागरिकांना काही काळ स्थलांतर करण्यास सांगण्यात आलंय.
  4.  घटनास्थळी स्फोटाच्या वेळी कुणी जखमी झाल्यास किंवा काही अप्रिय घटना घडल्यास अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या तैनात असतील.
  5.  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाडापाडीसाठी दुपारी 2.15 ते 2.45 पर्यंत एक्सप्रेस वे बंद ठेवला जाईल. या काळात वाहतूक वळवली जाईल.<

    /li>

  6.  या इमारती पाडण्यासाठी जवळपास 17.55 कोटी रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे हा खर्चदेखील सुपरटेक कंपनीच करणार आहे.
  7.  या दोन इमारतीत मिळून एकूण 950 फ्लॅट्स असून त्यांच्या बांधकामासाठी सुपरटेक बिल्डर्सनी 200 ते 300 कोटी रुपये खर्च झाले होते.
  8. इमारत पाडताना स्फोटामुळे प्रचंड धुळीचे लोट उठणार आहेत. खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरांना काळ्या पॉलिथिनने शक्य तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे.
  9. ट्विन टॉवर पाडण्यासाठी विविध सोसायट्यांनुसार मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ज्यांना घरात राहण्यास सांगितलंय त्यांनी घरातच दारं बंद करुन ठेवायचेत. गॅलरीत माणसं दिसली तरीही कारवाई केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत.
  10.  ट्विन टॉवर पाडण्याताना कुणीही खिडकीतून, गॅलरीतून किंवा घराच्या छतावर येऊन चित्रीकरण करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.