Explain : बजेटमध्ये एक असा मास्टर स्ट्रोक की, त्यामुळे भाजपच अनेक वर्षापासूनच मोठ स्वप्न होऊ शकतं पूर्ण
Explain : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये एक असा मास्टर स्ट्रोक मारलाय की, त्यामुळे एकाच स्वप्न भंग होऊ शकतं. पण दुसऱ्याच अनेक वर्षापासूनच एक स्वप्न पूर्ण होऊ शकतं. काय आहे ही खेळी?.

बजेट 2025 सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका असा मास्टर स्ट्रोक मारलाय की, त्यामुळे एकाच स्वप्न भंग होऊ शकतं. पण दुसऱ्याच अनेक वर्षापासूनच एक स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुम्ही म्हणालं कोणाच स्वप्न मोडू शकतं? आणि कोणाच स्वप्न पूर्ण होऊ शकतं? याचा अर्थ काय. याचा अर्थ दोन राजकीय पक्षांशी आहे. एक पक्ष सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्याची स्वप्न बघतोय, दुसरा मागच्या 27 वर्षांपासून सत्तेपासून दूर आहे. हे दोन पक्ष आहेत आम आदमी पार्टी आणि भाजप. ‘आप’ला चौथ्यांदा दिल्लीची सत्ता हवी आहे, तर भाजपला 27 वर्षापासूनचा दुष्काळ संपवायचा आहे. आज देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. केंद्रात ते सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आहेत. पण त्यांना अजून दिल्लीत जिंकता आलेली नाही. मागच्या 27 वर्षांपासून भाजपसाठी दिल्ली दूर आहे. पण आज निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या बजेटमुळे ते दिल्ली जिंकू शकतात.
देशाची राजधानी दिल्लीसाठी सीतारमण यांनी कुठली विशेष घोषणा केली नाही. पण इनकम टॅक्समध्ये सवलत देऊन दिल्लीच्या एका मोठ्या वर्गाला साधण्याचा प्रयत्न केलाय. वर्षाला 12 लाखाची कमाई करणाऱ्यांना एक रुपयाही टॅक्स द्यावा लागणार नाही अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. येत्या 5 फेब्रुवारीला 70 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. इथे केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीमध्ये थेट सामना आहे.
मध्यमवर्गीय किती टक्के?
पीपुल रिसर्च ऑन इंडियाज कंज्यूमर इकोनॉमीच्या एका रिपोर्टनुसार देशाची राजधानी दिल्लीत 67 लोक मध्यमवर्गीय आहेत. हा 2022 सालचा रिपोर्ट आहे. पीपुल रिसर्चनुसार संपूर्ण देशात दिल्लीत सर्वात जास्त मध्यमवर्गीय आहेत. रिपोर्टमध्ये म्हटलय की, दिल्लीमध्ये राहणाऱ्या मिडल क्लासच वर्षाच उत्पन्न 5 लाख ते 30 लाखा दरम्यान आहे. 2015 साली सीएसडीएस आणि लोकनितीने एक रिपोर्ट जारी केला होता. यात 71 टक्के लोकांनी स्वत:ला मिडल क्लास म्हटलं होतं. या सर्वेनुसार 27.8 टक्के लोकांनी स्वत:ला उच्च आणि 43.8 टक्के लोकांनी निम्न मध्यमवर्ग म्हटलं होतं. सीएसडीएसच्या एका अन्य आकड्यानुसार दिल्लीत 73 टक्के लोक प्रायवेट नोकरी करतात.
फायदाच फायदा
वर्षाला 12 लाख रुपये कमवणाऱ्याला आता थेट 80 हजार रुपयांचा फायदा होणार आहे. आधी हा पैसा सरकार टॅक्सच्या रुपात गोळा करत होती. याचा 8 लाखापेक्षा जास्त आणि 9 लाखापेक्षा कमी कमाई असणाऱ्यांना 30 हजाराचा फायदा होईल. 9 ते 10 दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना 40 हजार रुपये आणि 10 ते 11 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा फायदा होईल. 11 लाखापेक्षा जास्त आणि 12 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना 65 हजारचा फायदा होईल. दिल्लीत मध्यमवर्गीयांची संख्या जास्त आहे. नव्या कर रचनेमुळे त्यांचे पैसे वाचणार आहे. अप्रत्यक्षपणे याचा भाजपला राजकीय लाभ आणि केजरीवालांना झटका बसू शकतो.
निवडणूक आयुक्त काय म्हणालेले?
दिल्लीत पाच दिवसानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. आता राजधानीत आचार संहिता लागू आहे. त्यामुळे निर्मला सीतारमण यांनी दिल्लीसाठी कुठलीही विशेष घोषणा केली नाही. निवडणुकीची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं होतं की, बेजटमध्ये दिल्ली संदर्भात कुठलीही घोषणा करता येणार नाही.
