dhirendra shastri | लग्न कधी करणार? या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्री यांनी दिलं हे उत्तर
dhirendra shastri | बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर धाम येथे कथा वाचन करत होते. एका पत्रकाराने त्यांना तुमच लग्न कधी होणार? म्हणून प्रश्न विचारला. त्यावर धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांनी हसून उत्तर दिलं.

नवी दिल्ली : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी लग्नावरुन वक्तव्य केलय. आता मीच आईला सून शोधायला सांगतोय, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. “आता मी लग्न करणार आहे. आई-वडिलांची आज्ञा मिळताच लग्नाच्या बोहल्यावर उभा राहीन” असं पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री बागेश्वर धाम येथे कथा वाचन करत होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका पत्रकाराने त्यांना तुमच लग्न कधी होणार? म्हणून प्रश्न विचारला. त्यावर धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांनी हसून उत्तर दिलं. लग्नाची चर्चा ऐकून मी पकलोय. आता मीच आईला सून शोधायला सांगतोय.
काही पत्र येतायत, त्यामुळे लवकरच लग्न करणार असं आईला सांगितलय. त्यात धमकीची भाषा आहे, तुम्ही वरात घेऊ आला नाहीत, तर आत्महत्या करणार म्हणून. आता असे लवेरिया पत्र येत आहेत. म्हणून आम्ही एक व्हिडिओ पब्लिश केलाय. असं कोणी करु नका म्हणून आम्ही आव्हान केलय. गुरु आणि आई-वडिलांची आज्ञा मिळताच आम्ही लग्न करु असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.
इथे राम नाही, तर काय बाबर मिळणार?
त्याआधी बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी मथुरा ईदगाह परिसराच्या सर्वेसाठी अलाहाबाद हायकोर्टाकडून मिळालेल्या मंजुरीवर मोठ वक्तव्य केलं होतं. अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सर्व हिंदूंचा विजय आहे, असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. जिथे खोदकाम झालेलं नाही, तिथे सुद्धा खोदकार्य होईल. रघुबरचा देश आहे, इथे राम नाही, तर काय बाबर मिळणार? असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.
