‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रेल्वेच्या सैन्याच्या डब्यांच्या संख्येत तफावत, उद्यापासून देशभर गणना
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, रेल्वे बोर्डाला ऑनलाइन आणि प्रत्यक्ष नोंदींमध्ये संरक्षण डब्यांच्या संख्येत तफावत आढळली आहे. त्यामुळे, १५ आणि १६ जुलै रोजी देशभरात संरक्षण डब्यांची प्रत्यक्ष मोजणी केली जाणार आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सैन्याच्या संबंधित रेल्वे डब्यांची गणती करताना रेल्वे बोर्डाला ऑनलाईन डब्बा व्यवस्थापन प्रणालीचे आकडे आणि प्रत्यक्षातील डब्यांची संख्या यात खूपच फरक आढळल्याने रेल्वेत खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या सैन्य डब्यांची १५ आणि १६ जुलै रोजी पुन्हा गणती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सैन्याचे डबे हे संरक्षण कर्मचारी, उपकरणे आणि अन्य पुरवठ्याच्या वाहतूकीसाठी डिझाईल केले जातात.
‘मिलरेल’ आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक
‘ऑपरेशन सिंदूर’च्या साधारण पंधरवड्यानंतर ( सेना मुख्यालयातील रेल्वे मंत्रालयाची विशेष शाखा ) ‘मिलरेल’ आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी देशभरातील विविध स्थानांवर ठेवलेल्या सैन्यदलाच्या डब्यांची एकूण संख्या जाणून घेण्यासाठी एक बैठक घेतली. रेल्वे मंत्रालयाने १० जुलै २०२५ रोजी सर्व झोन पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की २३ -०५-२०२५ रोजी रेल्वे बोर्डातील मिलरेलच्या कार्यकारी संचालकाच्या सोबत झालेल्या बैठकीत हे आढळले की मिलरेल डब्यांची संख्या संबंधित IRFMM (भारतीय रेल्वे माल वाहतूक देखभाल व्यवस्थापन ) मध्ये उपलब्ध आकडे आणि मिलरेल कार्यालयातील उपलब्ध असलेल्या डब्यांच्या आकड्यात अंतर आहे.
गणना प्रक्रिया कशी होणार ?
आता १५ जुलै २०२५ रोजी डब्यांची गणना सुरु होणार आहे. आणि १६ जुलै २०२५ रोजी संपणार आहे. गणनेसंदर्भात विस्ताराने सांगताना मंत्रालयाने सांगितले की या प्रक्रियेत अन्य बाबींसह रस्ते किनारे, देखभालीच्या पिट लाईनवर वा कार्यशाळेत उभे केलेले खराब डब्ब्यासह अशा अन्य डब्यांसह ज्या डब्यांना बराच काळापासून निरीक्षणासाठी घेतले नाही अशा डब्यांची गणती केली जाणार आहे. त्यात म्हटले आहे की या एका संयुक्त मोहिमेत भारतीय रेल्वेच्या वर्णनात आणि कॅरेज आणि वॅगन विभागाद्वारे आणि रक्षा ‘सायडिंग्स’वर ( वेगळे रेल्वे मार्ग ) मिलरेलद्वारा निर्धारित केले जाणार आहे.
या मोहिमेचा उद्देश काय आहे?
आयआरएफएमएम अॅप्लिकेशनमध्ये एका विशेष मॉड्यूल (वॅगन सेन्सस ) द्वारे कोचची माहिती (फोटोसह) शोधणे, ओळखणे आणि अपडेट करणे हे उद्दिष्ट आहे, जेणेकरून सक्रिय कोचची नोंद दुरुस्त करता येईल. मंत्रालयाने सर्व रेल्वे विभागांना या कामात संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक संयुक्त पथके तयार करण्याची विनंती केली आहे.
