कधी एका रात्रीत मुलं करोडपती तर कधी चांदीचा पाऊस ! बिहारमध्ये चाललंय काय ?

बिहारमधील आणखी एका घटनेची चर्चा होऊ लागली आहे. 2019 मध्ये बिहारमध्ये सुरसंड या भागात चक्क चांदीचा पाऊस झाला होता. या घटनेमुळेदेखील बिहार भारतभर चर्चेत आले होते.

कधी एका रात्रीत मुलं करोडपती तर कधी चांदीचा पाऊस ! बिहारमध्ये चाललंय काय ?
SILVER RAIN
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 10:39 PM

पाटणा : बिहारमध्ये सध्या अचंबित करणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. यातील काही घडामोडी ऐकून तर नागरिक थक्क झाले आहेत. दोन मुलांच्या खात्यात थेट 960 कोटी रुपयांहून अधिक पैसे आल्याने देशभरात एकच चर्चा झाली. तर दुसरीकडे एका तरुणाच्या खात्यात चुकीने साडे पाच लाख रुपये आल्यानंतर त्याने ते सर्व पैसे खर्च करुन टाकल्याचा प्रकार समोर आला. या दोन्ही घटनांमुळे बिहारमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं जात आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील आणखी एका घटनेची चर्चा होऊ लागली आहे. 2019 मध्ये बिहारमध्ये सुरसंड या भागात चक्क चांदीचा पाऊस झाला होता. या घटनेमुळेदेखील बिहार भारतभर चर्चेत आले होते. (different incident takes place in bihar patna 900 crore in two students account silver rain in 2019)

सकाळी उठून पाहताच चांदीचा सडा

मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये 2019 मध्ये सीतामढी भागातील सुरसंड येथे चक्क चांदीचा पाऊस झाला होता असं म्हणतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर रस्त्यावर सगळीकडे चांदीच चांदी दिसल्यामुळे येथील नागरिक हैराण झाले होते. सुरसंड येथील टावर चौक ते बाराही गावापर्यंतच्या रस्त्यावर जिकडे तिकडे चांदीच चांदी दिसत होती. हा सगळा प्रकार पाहून आकाशातून चांदीचा पाऊस झाला असे येथील नागरिक म्हणत होते.

खरंच चांदीचा पाऊस झाला होता ?

रस्त्यावर जिकडे तिकडे चांदी पाहून नागरिक हैराण झाले होते. रस्त्यावर चांदी दिसताच नागरिकांनी शुद्ध चांदी गोळा करुन आपल्या घरात ठेवून दिली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर चांदी कुठून आली याचा तपास केला जात होता. सुरसंड या भागाच्या काही अंतरावरच नेपाळची सीमा आहे. याच सीमेतून एक तस्कर चांदी घेऊन जात होता. मात्र चांदी ठेवलेले पोते मध्येच फाटले, ज्यातून रस्याने चांदी सांडली. परिणामी जिकडे तिकडे चांदीच चांदी दिसू लागली.

एका रात्रीत दोन मुलं करोडपती

बिहारमध्ये असाच एक अजब प्रकार पाहायला मिळाला. खगरिया भागात राहणाऱ्या एका मुलाच्या खात्यात 900 कोटी रुपये आले. तर दुसऱ्या एका मुलाच्या खात्यात 60 रुपये आले. ही दोन्ही मुले एका रात्रीत करोडपती झाले. बँक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला.

चुकून खात्यात आले साडे पाच लाख रुपये

बिहारमधील हा प्रकार तर चकित करणाराच आहे. रंजित दास नावाच्या तरुणाच्या खात्यात मार्च महिन्यात अचानक साडे पाच लाख रुपये जमा झाले. हे पैसे नेमके कुठून आले, याचा तपास न करता त्याने सर्व रक्कम खर्च केली होती. बँके कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडला होता. एका दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवताना ते चुकून रंजित दास नावाच्या खात्यावर गेले. नंतर बँकेनं अनेक नोटिसा पाठवून संबंधित व्यक्तीला पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र माझ्या खात्यात आलेले पैसे मी का देऊ, असं उत्तर तरुण देत राहिला. त्याला पोलिसांनी अटक केलं आहे.

दरम्यान, बिहारमध्ये सरकारी अधिकारी किंवा एखाद्या छोट्या चुकीमुळे असे प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काही नागरिकांनी येथील सरकारी अधिकारी तसेच प्रशासनावर टीका केली आहे. तर काही लोकांनी अशा प्रकारच्या घटना होत असतात, असं सांगितलं आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? राहुल गांधीसोबत गुप्त बैठका सुरु

धक्कादाक, कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर 11 दिवस उपचार, मध्य प्रदेशातील रुग्णालयाचा भोंगळ कारभार

गुजरातमध्ये मुख्यमंत्री पटेल पण दबदबा ओबीसी मंत्र्यांचा? वाचा पटेल मंत्रीमंडळाचं जातीनिहाय समीकरण

(different incident takes place in bihar patna 900 crore in two students account silver rain in 2019)

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.