AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“या” ॲपने एअरपोर्टची सोपी केली प्रवेश प्रक्रिया, थेट एन्ट्रीसाठी A to Z माहिती वाचा

विमान प्रवासात चेक-इनच्या रांगेचा वैताग नकोय? मग ‘हे’ एक काम आधीच करून ठेवा! यामुळे तुम्हाला एअरपोर्टवर थेट २ मिनिटात एन्ट्री मिळेल. तर नेमकं काय करायचं जाणून घ्या संपूर्ण माहिती

या ॲपने एअरपोर्टची सोपी केली प्रवेश प्रक्रिया, थेट एन्ट्रीसाठी A to Z माहिती वाचा
आता विमानतळावरील प्रवेस सोपाImage Credit source: गुगल
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 2:13 PM
Share

विमान प्रवास म्हटलं की अनेक लोकांना उत्साहासोबत थोडासा त्रासही आठवतो विशेषतः एअरपोर्टवर लागणाऱ्या लांबलचक रांगा! सुरक्षेची तपासणी, बोर्डिंग पास, ओळखपत्र तपासणी, बॅग जमा करणं… या सगळ्यांमध्ये कधी कधी भरपूर वेळ वाया जातो. पण आता याच समस्येवर सोपं आणि आधुनिक उपाय सरकारनं शोधून काढलं आहे. ते म्हणजे ‘Digi Yatra’ नावाच अॅप

भारत सरकारचं ‘Digi Yatra’ हे विशेष ॲप आता प्रवाशांना केवळ दोन मिनिटांत एअरपोर्ट एन्ट्री मिळवून देणार आहे.

‘Digi Yatra’ म्हणजे नेमकं काय?

‘Digi Yatra’ हे एक डिजिटल ओळख प्रणालीवर आधारित ॲप आहे, जे तुमच्या चेहऱ्याच्या ओळखीवर काम करतं. या ॲपमुळे विमानतळावर प्रवेश करताना तुम्हाला कोणतेही कागदपत्र दाखवायची गरज उरत नाही. फक्त तुमचा चेहरा स्कॅन झाला की एन्ट्री मिळते!

‘Digi Yatra’ वापरण्याची सोपी पद्धत:

1. सर्वप्रथम ‘Digi Yatra’ ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून डाऊनलोड करा.2. मोबाईल नंबर आणि OTP द्वारे रजिस्ट्रेशन करा. 3. ओळखपत्र (आधार, पासपोर्ट वगैरे) डिजिलॉकरद्वारे किंवा ऑफलाइन अपलोड करा. 4. एक चांगला सेल्फी ॲपमध्ये अपलोड करा.5. यानंतर तुमचं ‘Digi Yatra ID’ तयार होईल.

प्रथमच वापरणार असाल, तर एअरपोर्टवरील डिजी यात्रा किओस्कवर जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करून घ्या.

‘Digi Yatra’ वापरणाऱ्या प्रवाशांसाठी भारतातील निवडक २४ विमानतळांवर स्वतंत्र गेट्स ठेवण्यात आले आहेत. या गेट्सवर चेहरा स्कॅन केल्यानंतर लगेच प्रवेश मिळतो. त्यामुळे आता गर्दीत उभं राहण्याची गरज नाही, आणि वेळेची बचतही होईल. सध्या ही सुविधा देशातील मोठ्या शहरांच्या विमानतळांवर सुरू आहे. केंद्र सरकार लवकरच ही सुविधा देशातील इतर एअरपोर्ट्सवरही सुरू करणार आहे. त्यामुळे भविष्यात विमान प्रवास आणखी सोपा, जलद आणि सुरक्षित होणार आहे. ‘Digi Yatra’ हे एक डिजिटल ओळख प्रणालीवर आधारित ॲप आहे, जे तुमच्या चेहऱ्याच्या ओळखीवर काम करतं. या ॲपमुळे विमानतळावर प्रवेश करताना तुम्हाला कोणतेही कागदपत्र दाखवायची गरज उरत नाही.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात