AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ते एकमेव हटके घर, जे आहे दोन देशात, तुम्हाला माहिती आहे का?

Indian Unique House: जगात अनेक अनोख्या गोष्टी आहेत. विस्मयकारक घटना आहेत. त्याचंच हे गाव आणि घर एक हटके उदाहरण आहे. कारण हे गाव दोन देशांच्या बॉर्डरवर आहे. तर हे एकमेव घर जे दोन्ही देशात असल्याचे मानले जाते. कुठे आहे हे गाव, कुठे आहे हे घर? जाणून घ्या.

भारतातील ते एकमेव हटके घर, जे आहे दोन देशात, तुम्हाला माहिती आहे का?
एकदम खास रे
| Updated on: Nov 30, 2025 | 3:53 PM
Share

Longwa Village: जर तुम्हाला भारतातून इतर देशात जायचे असेल तर फ्लाईटने जावे लागेल. अथवा चांगला रस्ता शोधावा लागेल. पण देशातील एका घराविषयी तुम्हाला मोठे आश्चर्य वाटेल. कारण की या दोन खोल्यांच्या घरात तुम्ही पोहचलात तर एक खोली ही भारतात तर दुसरी खोली ही दुसऱ्या देशात आहे. हे गाव आणि हे घर त्याच्या या हटके कारणामुळे जग प्रसिद्ध झाले आहे. जगातील अनेक लोक खास या घराला भेट देण्यासाठी कित्येक किलोमीटरचा प्रवास करत येतात. तुम्हाला हे गाव आणि हे घर कुठे आहे ते माहिती आहे का?

दोन देशांच्या नियंत्रण रेषेवर घर

हे घर दोन देशांच्या नियंत्रण रेषेवर आहे. दोन देशांच्या बॉर्डरवर हे घर आहे. या दोन खोल्यांच्या झोपडीवजा घरातील एक खोली भारताच्या हद्दीत तर दुसरी खोली ही आपला शेजारी देश ब्रह्मदेश आताचा म्यानमारमध्ये आहे. हे घर दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात येते. म्हणजे एकच घर पण दोन्ही देशात ते येते.

भारतात कुठे आहे हे घर?

तर एकाच घरातून भारत आणि म्यानमारची सीमा जाते. एक अनोखे घर नागालँड राज्यातील लोंगवा गावात आहे. हे गाव भारत-म्यानमारच्या सीमेवर वसलेले आहे. तर हे घर थेट नियंत्रण रेषेवर आहे. हे घर पाहण्यासाठी दूरुन लोक येतात. कित्येक किलोमीटरचा प्रवास करून येथील निसर्गाच्या प्रेमात पडतात.

भारतात बेडरूम तर किचन म्यानमारमध्ये

या घराचं एक खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे किचन म्यानमार या देशात आहे. तर बेडरुम भारतात आहे. यामुळे या घरात झोपण्यासाठी भारतात यावे लागते. तर पोट भरण्यासाठी म्हणजेच स्वयंपाकासाठी थेट म्यानमार देशात जावे लागते. हे अंतर चार बोटं देखील नाही.

फ्री मुव्हमेंट रिझीमचा खास दर्जा

विशेष म्हणजे हे घर गावातील प्रमुखाचे आहे. त्याच्या घरातून दोन्ही देशाची सीमा जाते. या घराला फ्री मुव्हमेंट रिझीमचा खास दर्जा देण्यात आला आहे. असा दर्जाप्राप्त हे एकमेव घर आहे. या घरातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व मिळालेले आहेत. ते भारतीय नागरिक आहेतच तर म्यानमारचेही ते रहिवाशी आहेत. बाजारापासून ते इतर अनेक सेवांसाठी येथील नागरिक हे दोन्ही देशात मुक्तपणे संचार करतात.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....