फक्त 10 रुपये खर्च, अन् परत आयुष्यात कधीच साप तुमच्या घरात येणार नाही, ही सोपी ट्रीक तुम्हाला माहितीये का?
साप हे थंड रक्ताचे जीव असतात त्यामुळे ते हिवाळ्यात आपल्यासाठी उबदार जागा शोधत असतात, अशा जागेचा शोध घेत असताना ते तुमच्या घरात देखील प्रवेश करू शकतात. साप घरात येऊ नये यासाठी आज आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

पावसाळ्याच्या तुलनेमध्ये हिवाळ्यात घरामध्ये किंवा इतर ठिकाणी साप निघण्याच्या घटना कमी होतात. मात्र अशा घटना पूर्णपणे थांबत नाहीत. पावसाळ्यात साप चावण्याचा जेवढा धोका असतो, तेवढाच धोका हा हिवाळ्यात देखील असतो, कारण मुळात साप हा थंड रक्ताचा जीव असतो. त्यामुळे हिवाळ्यात तो आपल्यासाठी उबदार जागेचा शोध घेत असतो, अशा अवस्थेमध्ये तुमच्या घरात काही अडगळ असेल किंवा अडचण असेल अशा ठिकाणी साप अडोशाला उबेसाठी येऊन बसण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात देखील साप घरात घुसू नये याची काळजी घ्यावी लागते. समजा तुमच्या घरात जर साप निघालाच किंवा तुम्हाला जर तुमच्या घरात साप दिसला तर त्याला मारू नका, त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या, ते या सापांना पकडून सुरक्षित अधिवासात सोडून देतील.
दरम्यान साप घरात निघूच नये, यासाठी किंवा सापानं घरात प्रवेश करू नये यासाठी देखील आपण काही उपाय करू शकतो. काही विशिष्ट पदार्थ असे असतात की ज्याचा वास सापांना सहन होत नाही, त्या वासाचा त्रास सापांना होतो. त्यामुळे ते घरात येत नाहीत. अशाच उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सापाला कांदा आणि लसून याचा वास सहन होत नाही. कारण लसून आणि कांद्यामध्ये सफ्ल्यूरिक कंपाऊंड असतं, ज्यामुळे सापांना या वासाचा तीव्र त्रास होतो. साप घरात येऊ नये यासाठी दोन ते तीन कांदे आणि लसनाच्या काही पाकळ्या घ्या, त्याचं मिश्रण करा आणि हे मिश्रण ज्या ठिकाणावरून साप घरात घुसू शकतो असं तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी थोड्या-थोड्या प्रमाणात पसरून ठेवा, साप पुन्हा कधीच घरात येणार नाही.
यासोबतच जिथे अडगळीची जागा आहे, जिथे तुम्हाला वाटतं की इथे साप हा सहज लपू शकतो, अशा अडचणीच्या जागा घरातून काढून टाका, घर आणि घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा, जर तुमच्या घराभोवती बाग असेल आणि बागेत गवत वाढलं असेल तर ते गवत काढून टाका, ज्यामुळे जरी बागेत साप आलाच तर तो तुम्हाला सहज दिसेल आणि त्याच्यापासून तुम्हाला कोणताही धोका होणार नाही.
टीप – वरील माहिती ही केवळ उपलब्ध स्त्रोताच्या आधारे देण्यात आली आहे, टीव्ही 9 याबाबत कोणताही दावा करत नाही.
