साप तुमच्या घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा कधीच येणार नाही, तुम्हाला ही सोपी ट्रीक माहितीये का?
अनेकदा साप घरात आढळून येतात, साप घरात येत असतील तर त्यामुळे धोका निर्माण होतो, त्यामुळे साप घरात येऊ नये, यासाठी आज आपण एक खास ट्रीक जाणून घेणार आहोत, ही ट्रीक खूप खास आणि तेवढीच प्रभावी देखील आहे.

साप म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर भीतीनं एक काटा उभा राहतो, अनेकदा विषारी साप चावल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र साप कोणताही असो सर्पदंश झाल्याचं लक्षात येताच अशा रुग्णाला थोडाही वेळ वाया न घालवता तातडीनं वैद्यकीय मदत मिळून दिली पाहिजे, त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे, हाच एक सर्पदंशावर एकमेव उपाय आहे. जर सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीनं मदत मिळाली तर त्याचा जीव वाचवला जाऊ शकतो. मात्र असे देखील काही साप असतात जे विषारी असतात, मात्र ते चावल्यानंतर त्या व्यक्तीला सर्पदंश झाल्याचं कळत देखील नाही, त्यामुळे उपचाराला उशीर होतो, आणि या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत साप आपल्या घरात येऊच नाही, यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं, त्यातीलच काही उपायांबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.
भारतामध्ये सापांच्या शेकडो जाती आढळून येतात, मात्र त्यातील काही मोजक्याचं सापांच्या जाती या विषारी आहेत, ज्यामध्ये मण्यार, घोणस, फुरसे आणि नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं देखील म्हणतो. प्रत्येकाच्या सवयी विषाचे परिणाम हे वेगवेगळे आहेत, विशेषत: मण्यार जातीचा साप हा प्रचंड विषारी असतो, रात्रीच्या वेळी तो उबेसाठी तुमच्या अंथरुणात देखील येऊ शकतो, याचा सर्वात मोठा धोका म्हणजे हा साप चावल्याचं लवकर कळत नाही, तोपर्यंत विषाचा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढतो. तर इतरही साप हे आपल्या शिकारीच्या शोधात तुमच्या घराच्या आसपास येऊ शकतात, साप घरात येऊ नयेत म्हणून आपण आज ज्या उपायांची माहिती घेणार आहोत, ते उपाय ग्रामीण भागांमध्ये सर्वात जास्त प्रभावी ठरू शकतात.
जसं मुंगसाला सापाचा शत्रू मानलं जातं, ज्या परिसरात मुंगसांचा वावर असतो, त्या परिसरात साप चुकूनही आढळत नाही, त्याचप्रमाणे कोंबडी ही देखील सापाची सर्वात मोठी शत्रू आहे, ग्रामीण भागांमध्ये जिथे -जिथे कुकुट पालन होतं, त्या परिसरात साप कधीच आढळत नाही, कारण कोबंडी सापावर थेट हल्ला करते, त्यामुळे सापाला तिथे धोका जाणवतो आणि तो अशा परिसरात कधीही येत नाही, त्यामुळे ग्रामीण भागात एक-दोन कोंबड्या पाळणं सहज शक्य आहे, ज्या घरात कोंबडी आहे, त्या घरापासून साप दूर राहतो, दुसरा सोपा उपाय म्हणजे अनेक गावांमध्ये नदीच्या कडेला मोर आढळून येतात, आपण मोर तर पाळू शकत नाही, मात्र नैसर्गिक अधिवासांमध्ये जे मोर आहेत, त्यांचं सवर्धन झालं पाहिजे, कारण ज्या गावाच्या परिसरात मोर आहेत, त्या गावांमध्ये सापाचं प्रमाण हे खूपच कमी असतं, कारण मोर हा सापाचा नैसर्गिक शत्रू आहे. तसेच मुंगसाचं देखील आहे, ज्या परिसरात मुंगसं आढळून येतात, तिथे साप येत नाही.
