AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astra-Mk2 Missile : आता पाकड्यांची खैर नाही, ‘अस्त्र’ PAF वर काळ बनून तुटून पडणार, इंडियन एअर फोर्ससाठी मोठी गुड न्यूज

Astra-Mk2 Missile : भारतासमोर आज चीन-पाकिस्तान असं दुहेरी आव्हान आहे. या दोन्ही देशांचा भारतासोबतच्या संबंधांचा इतिहास बघितला, तर नेहमीच भारताविरोधात कट कारस्थानात हे देश गुंतलेले आहेत. त्यामुळे भारताला 24 तास सज्ज, सर्तक रहावं लागतं. त्या दृष्टीने इंडियन एअर फोर्ससाठी एक चांगली बातमी आहे.

Astra-Mk2 Missile : आता पाकड्यांची खैर नाही, 'अस्त्र' PAF वर काळ बनून तुटून पडणार, इंडियन एअर फोर्ससाठी मोठी गुड न्यूज
BVRImage Credit source: Indian Air Force
| Updated on: Oct 15, 2025 | 11:41 AM
Share

इंडियन एअर फोर्ससाठी एक गुड न्यूज आहे. DRDO अस्त्र मार्क-2 एअर टू एअर मिसाइलची रेंज 200 किलोमीटरपेक्षा जास्त वाढवणार आहे. आधी या अस्त्र मिसाइलची रेंज 160 किलोमीटरपेक्षा थोडी जास्त होती. आता ही रेंज आणखी वाढवण्यात येईल. संरक्षण मंत्रालय लवकरच यावर चर्चा करणार आहे. IAF अशी जवळपास 700 मिसाइल्स विकत घेणार आहे. सुखोई आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) मध्ये ही क्षेपणास्त्र बसवण्यात येणार आहेत.

अस्त्र हे एक बियॉन्ड विजुअल रेंज (BVR) म्हणजे नजरे पलीकडच्या लक्ष्याचा भेद करणारं क्षेपणास्त्र आहे. शत्रुची टेहळणी विमानं, फायटर जेट्सना पाडण्यासाठी खासकरुन अस्त्र मिसाइलला डिझाईन करण्यात आलं आहे. भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाने अस्त्र मिसाइल विकसित केलं आहे. भविष्यात पाकिस्तान-चीन या दुहेरी शत्रुच्या फायटर जेट्सचा सामना करावा लागेल त्या दृष्टीने भारताने हे मिसाइल बनवलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारत आणि पाकिस्तानात मर्यादीत हवाई संघर्ष झालेला.

लांबूनच हवाई हल्ले केले

भारताने पाकिस्तानी एअर बेस आणि दहशतवादी तळांवर लांबूनच हवाई हल्ले केले. पाकिस्तानी एअर फोर्सच मोठं नुकसान झालं होतं. त्यांची अनेक फायटर विमानं, अमेरिकी बनावटीच F-16, आणि चिनी जेट्स जमिनीवर, हवेतच नष्ट झाली होती. त्यांचे ड्रोन्स आणि हेरगिरी करणारी विमान दक्षिण पाकिस्तानात पडली.

पाकिस्तानकडे कुठली एअर टू एअर मिसाइल?

पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्यासाठी हल्ला केला. त्यांनी PL-15 एअर टू एअर मिसाइल डागली. पण त्यात यश मिळालं नाही. अस्त्र मार्क-1 मिसाइलची रेंज 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यात Advance गाइडेन्स आणि नेविगेशन सिस्टिम बसवण्यात आलेली आहे. डीआरडीओच्या अनेक प्रयोगशाळा, 50 पेक्षा जास्त पब्लिक आणि प्रायवेट कंपन्या, जसं की हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) यामध्ये योगदान दिलं आहे.

चीनकडून कुठली मिसाइल्स विकत घेतली?

पाकिस्तानी एअर फोर्सकडे अस्त्र सारख्या लांब पल्ल्याच्या मिसाइल्सची संख्या कमी आहे. त्यांचं मुख्य फायटर जेट F-16 वर अमेरिकी AIM-120 सी-5 एएमआरएएएम मिसाइल आहे. त्याची रेंज 100 ते 120 किलोमीटर आहे. अलीकडेच पाकिस्तानने चीनकडून PL-15 E मिसाइल विकत घेतलं. त्याची रेंज 145 किलोमीटर आहे. मार्क-2 ची नवीन रेंज 200 किलोमीटरपेक्षा जास्त असल्याने पाकिस्तानी मिसाइल्सपेक्षा मारक क्षमता वाढेल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.