AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न कसं पूर्ण होणार; TV9च्या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगणार ‘देश की बात’

टीव्ही9 नेटवर्कने दिल्लीत व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन केलं आहे. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी हे संमेलन पार पडत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट, मालदीवचे माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी आणि संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांच्यासहीत अनेक दिग्गज सामील होणार आहेत.

What India Thinks Today : 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न कसं पूर्ण होणार; TV9च्या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगणार 'देश की बात'
PM MODI Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 23, 2024 | 4:12 PM
Share

नवी दिल्ली | 23 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमाला अवघे दोन दिवस उरले आहेत. या कार्यक्रमात देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोणावर चर्चा होणार आहे. एवढेच नव्हे तर उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रावरही या समीटमध्ये मंथन केलं जाणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंचावर येऊन देशाची रुपरेषा मांडणार आहेत. India: Poised For The Next Big Leap हा या इव्हेंटचा विषय आहे. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समीट पार पडत आहे. राजकारण, सिनेमा, क्रीडा, आरोग्य आणि संस्कृतीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर या समीटमध्ये चर्चा होणार आहे. तर, 27 फेब्रुवारी रोजी सत्ता संमेलन होणार आहे. त्यात राज्यातील अनेक मुख्यमंत्र्यांसहीत विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. ‘नव्या भारताची गॅरंटी 2024’ ही सत्ता संमेलनाची थीम आहे.

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या दुसऱ्या पर्वात जगभरातील दूरदृष्टीकोण असलेले आणि धोरणं ठरवणारे प्रतिभावंत भाग घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी समीटच्या दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता मुख्य भाषण करतील. मोदी आपल्या भाषणात 2047पर्यंतच्या विकसित भारताच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा संकल्प करण्यावर भर देणार आहेत. त्याशिवाय महिला, शेतकरी, गरीब आणि तरुणांच्या विकासाच्या संदर्भातील त्यांच्या सरकारच्या योजनांची माहितीही देणार आहेत. मोदी यावेळी नारी शक्तीवरही बोलण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही संदेशही देण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान येणार

दरम्यान, या सोहळ्याला ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट हे उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, स्मृती ईराणी, अश्विनी वैष्णव आणि अनुराग ठाकूरही उपस्थित राहणारआहेत. येत्या 25 फेब्रुवारीपासून ही समीट सुरू होत आहे.

त्याशिवाय भारताचे जी-20 शेरपा अमिताभ कांत, ग्रॅमी पुरस्कार विजेते राकेश चौरसिया आणि व्ही सेल्वगनेश, क्रिकेटपटू सूर्य कुमार यादव, माजी बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांच्यासह बॉलिवूडमधून रवीना टंडन, विक्रांत मैस्सी आणि साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनही उपस्थित राहणार आहेत.

सत्ता संमेलनात अनेक मुख्यमंत्री

येत्या 26 फेब्रुवारीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार आहेत. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट, मालदीवचे माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी आणि संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीनसहीत अनेक दिग्गज उपस्थित राहून आपली भूमिका मांडणार आहेत. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी सत्ता संमेलन सुरू होणार आहे. या सत्ता संमेलनात पुष्कर सिंह धामी, मोहन यादव, विष्णुदेव साय, मनोहर लाल खट्टर, भगवंत मान, हिमंत बिस्वा सरमा आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मुख्यमंत्री सामील होणार आहे. त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा या संमेलनात भाग घेणार आहेत.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.