Duologue NXT: शालिनी पासी यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी, टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्यासोबत खास चर्चा
टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे टीव्ही 9 नेटवर्कच्या ड्यूओलॉग NXT या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. या शोच्या नवीन भागात बरुन दास यांनी डिझाईन कलेक्टर, कला संरक्षक आणि फॅशन आयकॉन शालिनी पासी यांची मुलाखत घेतली.

टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे टीव्ही 9 नेटवर्कच्या ड्यूओलॉग NXT या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. या शोच्या नवीन भागात बरुन दास यांनी डिझाईन कलेक्टर, कला संरक्षक आणि फॅशन आयकॉन शालिनी पासी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शालिनी यांनी भीतीवर मात करत आयुष्यात आलेल्या वळणांचा कसा सामना केला आणि उंच भरारी कशी घेतली याची माहिती दिली. या मुलाखतीतील प्रमुख मुद्द्यांवर नजर टाकूयात.
शालिनी पासी यांचा प्रवास चिकाटी आणि प्रामाणिकपणाचे एक खास उदाहरण आहे. एकेकाळी कॅमेरा समोर उभी राहण्यास लाजणाऱ्या शालीनी यांनी 2018 मध्ये या भीतीवर मात केली. यानंतर शालिनी यांना यश मिळत गेले. सुरुवातीला आत्म-विश्लेषणाचा स्रोत म्हणून काम करणारी गोष्ट नंतर तिची सर्वात शक्तिशाली अभिव्यक्ती बनली आहे.
बरुण दास काय म्हणाले?
शालिनी यांच्याबाबत बोलताना बरुन दास म्हणाले की, ‘शालिनी या आम्ही ड्युओलॉग एनएक्सटीमध्ये आणलेल्या महिलांचे प्रतिनिधित्व करत आहेत. अशा महिला ज्या त्यांच्या आयुष्यातील एका वळणावर आहेत आणि त्यांच्या पुढील पावलासाठी तयार आहेत. त्यांची ताकद त्यांच्या पदांमध्ये नसून प्रामाणिकपणामध्ये आहे, याचा लाखो लोकांवर प्रभाव पडत आहे.’
शालिनी पासी काय म्हणाल्या?
ड्युओलॉग एनएक्सटीवरील मुलाखतीचा अनुभव शेअर करताना शालिनी म्हणाल्या की, ‘मी येथून कल्पना, प्रेरणा आणि विशेषतः इतक्या यशस्वी होस्टसोबत मुलाखतीचा अनुभव अशा खूप काही गोष्टी घेऊन जात आहे. मला आनंद आहे की मी प्रेक्षकांशी या मार्गाने जाडली जाऊ शकली.’
शालिनी पासी यांचे शिकण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता प्रेरणादायी आहे. शालिनी यांनी चित्रकला, फोटोग्राफी आणि कॅमेरा फेस करण्याची कला स्वतःहून शिकल्या आहेत. त्या म्हणाल्या की, ‘माझ्याकडे 9 ते 5 पर्यंतचे प्रशिक्षण किंवा मार्गदर्शक नव्हते. माझ्या मुलाला वाढवताना मी रात्री अभ्यास केला. एखाद्या गोष्टीची उत्सुकता हाच माझा सर्वात मोठा गुरू आहे.
शालिनी यांचा दृष्टिकोन महिला सक्षमीकरणात लवचिकतेची भूमिका किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित करते. वादळात योग्य जोखीम पत्करणे याला शालिनी प्रतिकाराचे कृत्य म्हणून पाहतात. त्यांनी सांगितले की “विरोध हा आत्म-अभिव्यक्ती आणि प्रेरणेचा एक शक्तिशाली प्रकार आहे.’
शालिनी यांचे काम केवळ कमी स्वत:पुरते मर्यादित नाही; त्यांचे ध्येय समाजावर प्रभाव पाडणे हे देखील आहे. ती स्वतःकडे ‘सेलिब्रिटी’ किंवा ‘क्युरेटर’ म्हणून पाहत नाही, तर एक आई, नागरिक आणि कलाकार म्हणून पाहते. ती चित्रपट आणि कंटेंट निर्मितीच्या जगात संधीचा शोध घेत आहे, मात्र यासाठी ती तिच्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही.
ड्युओलॉग एनएक्सटी सारख्या प्लॅटफॉर्मला मुलाखत देणे शालिनी यांच्यासाठी खूप खास आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘मी कधीही माझे आयुष्य असे विचार करून जगले नाही की मला महिलांसाठी एक आदर्श बनावे लागेल, माझा हेतू नेहमीच असे जीवन जगण्याचा राहिला आहे ज्यामुळे मला समाधान मिळेल. पण आता जेव्हा मी ते इतरांना प्रेरणा देते हे पाहतो तेव्हा मला जबाबदारीची भावना येते.”
दरम्यान, Duologue NXT च्या माध्यमातून, बरुण दास अशा महिलांच्या कथा प्रकाशात आणत आहेत – ज्या महिला केवळ त्यांच्या आयुष्यात प्रगती करत नाहीत तर, धैर्य आणि प्रामाणिकपणाने जगण्याचा अर्थ काय आहे हे देखील समाजासमोर सादर करत आहत. शालिनी पासी यांची मुलाखत आज रात्री 10.30 वाजता, News9 वर आणि ड्युओलोग यूट्यूब चॅनेल आणि News9 Plus अॅपवर प्रसारित होणार आहे.
