AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या आयुष्यातील यशाचं नेमकं गमक काय? पाहा Tv9 चा स्पेशल कार्यक्रम

नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती या दाम्पत्याला देशात कुणी ओळखणार नाही, असं क्वचित घडेल. नारायण मूर्ती हे इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक आहेत. पण खरंतर त्यांना भारतातील आयटी क्षेत्राचे संस्थापक मानलं जातं. त्यांनी भारतात आयटी क्षेत्राचा पाया रचलाय.

सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या आयुष्यातील यशाचं नेमकं गमक काय? पाहा Tv9 चा स्पेशल कार्यक्रम
| Updated on: Apr 14, 2023 | 11:01 PM
Share

नवी दिल्ली : देशातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान उद्योगपती एनआर नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आज Tv9 चे MD-CEO बरुण दास यांच्या ‘डायलॉग विथ बरुण दास’ या विशेष कार्यक्रमात खास मुलाखत दिली. जवळपास तासभर ही मुलाखत चालली. या तासाभराच्या मुलाखतीत मूर्ती दाम्पत्याने अनेक मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडलं. विशेषत: लीडरशीप, भारतातील उद्योग जगताने नेमकं काय शिकलं पाहिजे, व्यावसायासाठी आव्हानं नेमकी काय असू शकतात, अशा प्रश्नांसह मूर्ती दाम्पत्याच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, आव्हानं आणि त्यांच्या यशाचं गमक नेमकं काय? अशा विविध विषयांवर त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

खरंतर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती या दाम्पत्याला देशात कुणी ओळखणार नाही, असं क्वचित घडेल. नारायण मूर्ती हे इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक आहेत. पण त्यांना भारतातील आयटी क्षेत्राचे संस्थापक मानलं जातं. त्यांनी भारतात आयटी क्षेत्राचा पाया रचला. तर त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती या सुप्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तसेच त्या शिक्षिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षादेखील आहेत. विशेष म्हणजे व्यवसाय, गुंतवणूक आणि सामाजिक कार्य या सगळ्या गोष्टी करत असताना एक उत्तम आई-वडील कसे बनू शकले? या प्रश्नाचंदेखील त्यांनी उत्तर दिलं.

कुलकर्णी असंच आडनाव ठेवलं असतं तर काय झालं असतं?

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बरुण दास यांनी एक अनोखा प्रश्न विचारला. सुधा मूर्ती यांचं लग्नाआधीचं आडनाव कुलकर्णी होतं. त्यामुळे इन्फोसिसचे संस्थापक कुलकर्णी असंच आडनाव ठेवलं असतं तर काय झालं असतं? असा प्रश्न विचारला. यावर एनआर नारायण मूर्ती यांनी आधी उत्तर दिलं. “मला वाटतं की आमच्या दोघांमध्ये सुरुवातीलाच या विषयावर चर्चा झाली होती. संस्थापक आणि सह-संस्थापकांसाठी ती योग्य आहे. आम्ही दोघांनी ही सुद्धा चर्चा केली होती की, एकतर आपण दोघं यामध्ये सहभागी होऊयात, नाहीतर आपल्या दोघांपैकी कुणीतरी एक सहभागी होईल. मला वाटतं, मी त्यावेळी संस्थापकांच्या ग्रुपमधील अनावश्यक समस्या कमी करण्याचा प्रयत्न करत होतो”, असं उत्तर त्यांनी दिलं.

यावेळी सुधा मूर्ती यांनी आपल्या पतीच्या उत्तराला सहमती देत नारायण मूर्ती यांनी तरुणपणी कशाप्रकारे सॉफ्टवेअर कंपनी बनवण्याचं स्वप्न पाहिलं, या विषयी माहिती दिली. पतीने आपल्याला 1981 साली आंत्रप्रेन्योरशिपची भूमिका समजावून सागितली होती, अशी माहिती सुधा मूर्ती यांनी दिली.

खरंतर दोघांमध्ये इतकं चांगले नातं निर्माण झालंय की त्यांना ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखलं जातं. दोघांनी वेगवेगळ्या दिशेने काम केलं. एकाने व्यवसाय वाढवला तर दुसऱ्याने समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही जाण डोळ्यांसमोर ठेवून काम केलं. दोघांनी असंख्य संधी आणि आव्हानांचा सामना करत जागतिक स्तरावर भारताची ओळख निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली.

‘मी त्यांच्यापासून खूप प्रभावित झालो’

TV9 नेटवर्कचे MD-CEO बरुण दास यांनी या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया दिली. “नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान मी त्यांच्यापासून खूप प्रभावित झालो आणि प्रेरित झालो. त्यांच्या जिद्द आणि कणखर नेतृत्वामुळे इन्फोसिससारख्या कंपनीचा विकासाचा प्रवास कौतुकास्पद ठरला आहे. तथापि, मला अजूनही असे वाटते की 40 वर्षांपूर्वी सुधा कुलकर्णी एक चांगली पत्नी असूनही त्यांनी नारायण मूर्ती यांना मागून पाठिंबा न देता स्वत: जिद्दीने पुढे आल्या. भारतीय उद्योगातील महिलांचा सहभाग समजून घेत त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली”, अशी प्रतिक्रिया बरुण दास यांनी दिली.

“मला वाटतं की या जोडीच्या नेतृत्वातून भारताला खूप काही शिकता येईल. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच इन्फोसिसने आपल्या विविध व्यवसायांमध्ये यशाचा झेंडा रोवला. असे केल्याने आपण भविष्यात भारताच्या विकासाचा मार्ग मोकळा करू शकतो”, असंदेखील बरुण दास म्हणाले.

‘डायलॉग विथ बरुण दास’ हा एक संवादात्मक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दिग्गज किंवा दिग्गज बनण्याच्या मार्गावर असलेले व्यक्तिमत्त्व त्यांचा प्रवास शेअर करतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते मोकळ्या मनाने आपले विचार आणि अनुभव मांडतात. हा कार्यक्रम कधीही चिथावणीखोर मथळे काढण्याचा प्रयत्न करत नाही. याउलट मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला आरामशीर संभाषण करण्याची संधी दिली जाते.

या संपूर्ण कार्यक्रमाला जगातील पहिल्या बातम्यांचं OTT प्लॅटफॉर्म असलेल्या News9 Plus वर तीन भागांमध्ये प्रसारित केलं जात आहे

EP1: INDIAS WORLD

EP2: MAN, WOMAN, & INFOSYS

EP3: THE STARTUP DILEMMA

तुम्ही एपिसोड पाहण्यासाठी News9 Plus एपला https://onelink.to/htmqpz या लिंकवरुन डाऊनलोड करु शकता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.