Operation Sindoor : पाकिस्तानची एक चूक आणि भारताला समजलं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकचे 100 सैनिक ठार
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान पुढची काही वर्ष नक्कीच विसरणार नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानला न विसरता येणारा धडा शिकवला आहे. आता चार ते पाच महिन्यानंतर पाकिस्तानच्या बाजूला किती मोठं नुकसान झालय, त्याची माहिती समोर येत आहे.

भारतीय सैन्याचे डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन्स (DGMO) लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी मंगळवारी एका खुलासा केला. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी नियंत्रण रेषेजवळ (LoC) पाकिस्तानचे 100 पेक्षा जास्त सैनिक मारले गेल्याचा दावा राजीव घई यांनी केला. पाकिस्तानकडून मरणोपरांत शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्या यादीच्या आधारे त्यांनी हा दावा केला आहे. मे महिन्यात झालेल्या या संघर्षात पाकिस्तानने 12 विमानं गमावली असही ते म्हणाले. 7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर पाकिस्तानने सीमेपलीकडून फक्त गोळीबार केला नाही, तर मिसाइल हल्ले सुद्धा केले.
“पाकिस्तानने संभवतः अजाणतेपणी 14 ऑगस्ट रोजी आपली पुरस्कारांची यादी जारी केली. त्यात मरणोपरांत दिलेल्या पुरस्कारांवरुन लक्षात येतं की, LOC वर त्यांच्या 100 पेक्षा जास्त सैनिकांनी प्राण गमावले” असं लेफ्टिनेंट जनरल घई म्हणाले. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केल्यानंतर पुढे विषय वाढवायचा नाही ही भारताची भूमिका होती, असं ते म्हणाले.
DGMO ने अजून काय माहिती दिली?
एअरफोर्स चीफ ए.पी.सिंह यांनी जी माहिती दिली, त्याचा DGMO ने पुनरुच्चार केला. पाकिस्तानने या संघर्षात 12 विमानं गमावली. 9 आणि 10 मे च्या रात्री इंडियन एअर फोर्सकडून अचूक हल्ले झाले. त्यात पाकिस्तानी तळांचं नुकसान झालं. पाकिस्तानच्या C-130 क्लास एअरक्राफ्ट, एक AEW&C (एयरबोर्न अर्ली वार्निंग अँड कंट्रोल) आणि चार ते पाच फायटर विमानं भारताने पाडली.
सर्व ड्रोन हल्ले सुद्धा फेल
“पाकिस्तानच हवेतही मोठं नुकसान झालं जगातील सर्वात मोठं ग्राउंड-टू-एयर किल 300 किलोमीटर प्लसवर झालं हे आपल्या सर्वांना माहित आहे. पाच हाय-टेक फायटर जेट्सना टार्गेट करण्यात आलं“ असं लेफ्टिनेंट जनरल घई म्हणाले. भारताविरुद्ध पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले सुद्धा फेल गेले असं DGMO म्हणाले. दोन्ही DGMO मध्ये चर्चा झाल्यानंतरही पाकिस्तानने ड्रोन्स पाठवली होती. पण ते सुद्धा हल्ले यशस्वी होऊ शकले नाहीत.
DGMO नी पहलाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना मारण्याचा सुद्धा उल्लेख केला. “सैन्य त्यांना नरकात पाठवण्यासाठी शोधत होतं आणि आम्ही ते काम केलं. आम्हाला 96 दिवस लागले. पण आम्ही त्यांना आराम करु दिला नाही“ असं राजीव घई म्हणाले.
