AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन आणि त्यांच्या मुलीच्या घरावर ED चा छापा

2017 साली एक्सालॉजिक आणि CMRL मध्ये सॉफ्टवेयर आणि मार्केटिंग सेवांसाठी कॉन्ट्रॅक्ट झाला.पण कुठलीही सेवा दिली नाही असा आरोप आहे. वर्ष 2017 शी संबंधित हा वाद आहे.

केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन आणि त्यांच्या मुलीच्या घरावर ED चा छापा
kerala former cm pinarayi vijayan
| Updated on: May 27, 2026 | 10:44 AM
Share

प्रवर्तन निदेशालय ईडीने केरळमध्ये 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात माजी मुख्यमंत्री आणि केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन आणि त्यांची मुलगी वीणा विजयन यांची ठिकाणं सुद्धा आहेत. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित ही कारवाई आहे. यात केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मुलगी आणि त्यांची कंपनी एक्सालॉजिक सॉल्यूशंस प्रायवेट लिमिटेडचं नाव समोर आलेलं. एप्रिल 2025 मध्ये SFIO ने दाखल केलेलं आरोपपत्राच्या आधारावर ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. SFIO ने वीणा विजयनची आयटी कंपनी एक्सालॉजिक सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड (ESPL) वर गंभीर आरोप केले होते. कोच्चि स्थित Cochin Minerals and Rutile Limited (CMRL) कडून 2018-19 पासून तीन वर्ष कुठलीही सेवा दिल्याशिवाय बेकायद पैसा मिळत होता असा आरोप आहे. 2017 साली एक्सालॉजिक आणि CMRL मध्ये सॉफ्टवेयर आणि मार्केटिंग सेवांसाठी कॉन्ट्रॅक्ट झाला.पण कुठलीही सेवा दिली नाही असा आरोप आहे.

वर्ष 2017 शी संबंधित हा वाद आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मुलगी वीणच्या एक्सालॉजिक कंपनीने कोच्चि मिनरल्स एंड रूटाइल लिमिटेड (CMRL) सोबत सॉफ्टवेयर आणि मार्केटिंग सेवा प्रदान करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केलेला. पण या कराराच्या आडून कुठलही काम केल्याशिवाय कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

चौकशी करण्याचे SFIO ला आदेश

या आर्थिक घोटाळ्याचा वर्ष 2019 मध्ये पहिल्यांदा खुलासा झालेला. आयकर खात्याने सीएमआरएल परिसरात मोठी छापेमारी केली होती. आयकर विभागाने तपासानंतर विस्तृत चौकशी अहवाल सोपवलेला. माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या कंपनीसोबत झालेल्या संशयास्पद व्यवहारांचा अधिकृत उल्लेख होता. वाद सतत वाढत गेल्यानंतर केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये एक्सालॉजिक सॉल्यूशंस, सीएमआरएल आणि केरल राज्य औद्योगिक विकास निगमशी संबंधित आर्थिक अनियमितताच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्याचे SFIO ला आदेश दिले होते.

खासगी कपंनी सीएमआरएल मध्ये सरकारी संस्था केएसआईडीसीची एकूण 13.4 टक्के हिस्सेदारी आहे. एसएफआयओची चौकशी आणि आयकर विभागाच्या रिपोर्टच्या आधारावर ED ने मार्च 2024 मध्ये मनी लॉन्ड्रिंगच प्रकरण नोंदवलं होतं.

Follow Us
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली
लवकर आटपा बोलणं झोंबलं... भुजबळ- तटकरेंची सुनेत्रा वहिनींसमोरच जुंपली.
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा
ठाणे ते रायगड….विधान परिषदेसाठी शिंदे गटात या नावांची जोरदार चर्चा.
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....