AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा नवरा बकरा..; सुनिता अहुजाने सर्वासमोर उडवली गोविंदाची खिल्ली, चाहते संतापले

शिल्पा शेट्टीचा नवीन कॉमेडी आणि कुकिंग शो 'माँ है ना'चा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. या शोमध्ये बरेच सेलिब्रिटी त्यांच्या मुलांसोबत सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात गोविंदाची पत्नी सुनिता अहुजासुद्धा उपस्थित होती.

माझा नवरा बकरा..; सुनिता अहुजाने सर्वासमोर उडवली गोविंदाची खिल्ली, चाहते संतापले
Govinda and Sunita AhujaImage Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2026 | 10:18 AM
Share

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा एक नवीन शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘माँ है ना’ असं या शोचं नाव असून हा एक कॉमेडी आणि कुकिंग शो आहे. यामध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटी त्यांच्या मुलांसोबत सहभागी होणार आहेत. मंगळवारी या शोचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आणि त्यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोमध्ये भाग घेणारे सेलिब्रिटी कार्यक्रमात खूप मजामस्ती करताना दिसले. यावेळी अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा तिच्या मुलीसोबत पोहोचली होती. शिल्पा शेट्टीच्या या कार्यक्रमातून सुनिता टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. आपल्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाणारी सुनिता या कार्यक्रमातसुद्धा पती गोविंदाची खिल्ली उडवताना दिसली. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

‘माँ है ना’ या शोच्या ट्रेलर लाँचदरम्यान सुनिता अहुजा पापाराझींसोबत मस्करी करताना दिसली. पापाराझींशी बोलताना सुनिता म्हणते की, बकरी है. यावर मागून आवाज येतो की, तो तुमचा नवरा आहे. हे ऐकून सुनिता चकीत होते आणि म्हणते, माझा नवरा.. तो बकरी नाही. मग इशारा करत म्हणते की, तो बकरा आहे. सुनिताच्या तोंडून हे शब्द ऐकून तिच्या बाजूला उभी असलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकियासुद्धा थक्क होते. सुनिताचं असं बोलणं उर्वशीला अजिबात रुचलं नसल्याचं तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येतं.

पहा व्हिडीओ-

सुनिता अहुजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी तिच्यावर टीका करू लागले आहेत. ‘हे खूप चुकीचं आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आज तू जी काही आहेस, ते गोविंदामुळेच आहेस आणि त्याचीच खिल्ली उडवतेस’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘गोविंदाशिवाय तुझं अस्तित्त्व काहीच नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सुनितावर टीका केली. तिने अशा पद्धतीने गोविंदाची मस्करी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही काळापासून सुनिता आणि गोविंदा यांच्या वैवाहिक आयुष्यात खटके उडत असल्याची चर्चा आहे.

लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा आणि सुनिताच्या संसारात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे दोघं घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. काही मुलाखतींमध्ये सुनिता अप्रत्यक्षपणे गोविंदासोबतच्या नात्यातील नाराजी बोलून दाखवली होती. इतकंच काय तर पुढच्या जन्मी असा नवरा नको, असं तिने थेट म्हटलं होतं.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल