AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे… साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?

महाराष्ट्रात साखरेनंतर आता अंड्यांचे भाव वाढले आहेत, एका अंड्याची किंमत 7-9 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा वापर वाढल्याने कोंबड्यांच्या खाद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पोल्ट्री उद्योगाची उत्पादन खर्च वाढला असून, गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किंमतीत 35-40% वाढ झाली आहे.

Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे... साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?
Egg Price HikeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 11:26 AM
Share

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात साखर आणि कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं असतानाच आता सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. अंड्यांच्या किंमतीत एका झटक्यात वाढ झाली आहे. इथेनॉलसाठी कोंबडीचं खाद्य वापरलं जात आहे. म्हणजे कोंबडीला देण्यात येणारी मक्का इथेनॉल बनवण्यासाठी वापरली जात आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अंड्यांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटी (NECC)च्या आकडेवारीनुसार, गेल्या एक वर्षात अंड्यांच्या किंमतीत 35-40 टक्क्यांनी वााढ झाली आहे. म्हणजे आता एका अंड्याची किंमत 7 रुपये झाली आहे. रिटेलमध्य एका अंड्याची किंमत 8.50 ते 9 रुपयांच्या दरम्यान आहे.

पोल्ट्री इंडस्ट्रीच्या मते अंड्यांच्या या किंमती सध्या तरी स्थिर राहतील. थंडीत साधारणपणे अंड्यांची मागणी वाढते. त्यामुळे त्यावेळी अंड्यांच्या किंमतीत पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळू शकते. एनईसीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, एकूण मक्क्याच्या उत्पादनाचा 37 टक्के भाग आता इथेनॉल डिस्टिलरीजमध्ये जात आहे. गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किंमतीत सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अजूनही या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

खाद्यांचा पुरवठा कमी झाला

सरकारच्या इथेनॉल ब्लेंडिंग नियमाच्यानुसार तेल कंपन्यांना फ्यूल पंपावर विकण्यासाठी पेट्रोलमध्ये बायोफ्यूल मिसळणं आवश्यक आहे. ब्लेंडेड पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे उत्पादनासाठी ऊस आणि मक्क्याचा वापर केला जातो. त्यामुळे साखर बनवणे आणि फिडस्टॉकसाठीच्या त्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. इथेनॉल बनवण्यासाठी मक्क्याचा वापर वाढल्याने पशूंच्या खाद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

मक्क्याच्या किंमतीत वाढ

दरम्यान, मक्क्याचा इथेनॉलसाठी वापर होत असल्याने मक्क्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या तीन वर्षात मक्क्याच्या किंमती 14 हजार प्रति टनाहून वाढून आता 26,500 प्रति टन झाल्या आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांची प्रोडक्शन कॉस्टही वाढली आहे. गेल्या पाच महिन्यात मक्क्याच्या किंमतीत 20 टक्क्याने वाढ झाली आहे. एनईसीसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोल्ट्री व्यावसायिकांसाठी मक्क्याचा खर्च सर्वाधिक आहे. म्हणजे पोल्ट्री प्रोडक्शन कॉस्टच्या 65 ते 70 टक्के एवढा हा खर्च आहे. मक्क्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने पोल्ट्री इंडस्ट्रीची चिंता वाढली आहे. संसदेच्या डेटानुसार, भारतात मक्क्याचं एकूण उत्पादन जवळपास 43.4 मिलियन टन आहे. त्यात सुमारे 17 मिलियन टनचा वापर इथेनॉलसाठी होतो. त्यामुळे पोल्ट्री फिल्ड आणि इतर कामासाठी मक्क्याची कमतरता भासत आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु