AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPF Interest Rate : लाखो कर्मचाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका; आता ईपीएफवर मिळणार केवळ 8.1 टक्के व्याज!

केंद्र सरकारनं ईपीएफच्या व्याज दरात मोठी कपात केली आहे. 2021 - 22 साठी आता 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. ईपीएफवरील व्याज दरात कपात केली जाऊ शकते असा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता.

EPF Interest Rate : लाखो कर्मचाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका; आता ईपीएफवर मिळणार केवळ 8.1 टक्के व्याज!
नियोक्त्याविरोधात तक्रार
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 03, 2022 | 8:23 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारनं ईपीएफच्या व्याज दरात (EPF Interest Rate) मोठी कपात केली आहे. 2021 – 22 साठी आता 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. ईपीएफवरील व्याज दरात कपात (Interest rate cuts) केली जाऊ शकते असा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. ईपीएफओ बोर्डाचा व्याज दर 8.5 टक्क्यावरुन 8.1 टक्के करण्याचा प्रस्तावाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी पाठिंबा दर्शवलाय. सीतारामण म्हणाल्या की, 40 वर्षात ईपीएफच्या व्याज दरात कपात केली नव्हती. आज व्याज दरात करण्यात आलेली कपात वस्तुस्थिती दर्शवते.

राज्यसभेत बोलताना निर्मला सीतारामण म्हणाल्या की, 40 वर्षात व्याज दरात कपात केली गेली नव्हती. ईपीएफच्या सेंट्रल बोर्डाकडून आजची वस्तुस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, हा प्रस्ताव अद्याप अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी आलेला नाही. ईपीएफओने मार्चमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 230 व्या बैठकीनंतर पीएफवरील व्याज दर 8.1 टक्के करण्यात येईल अशी घोषणा केली होती. हा व्याज दर गेल्या चार दशकातील सर्वात कमी आहे.

कोणत्या आर्थिक वर्षात पीएफवर किती व्याजदर?

  • 2015 – 8.75 टक्के
  • 2016 – 8.80 टक्के
  • 2017 – 8.65 टक्के
  • 2018 – 8.55 टक्के
  • 2019 – 8.65 टक्के
  • 2020 – 8.50 टक्के
  • 2021 – 8.50 टक्के
  • 2022 – 8.10 टक्के

ईपीएफ व्याजावर लागू होणारे नवे आयकर नियम, पॉईंट टू पॉईंट

  1. नवीन नियमांच्या नुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याच्या भविष्य निधी खात्यामध्ये जमा होणारे कोणतेही व्याज केवळ 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या योगदानासाठी कर मुक्त असेल. कर्मचाऱ्यांच्या अडीच लाखांहून अधिक योगदानासाठी कर आकारणी केली जाईल. कर अभ्यासक बलवंत जैन यांच्या मते, आस्थापना कर्मचाऱ्याच्या भविष्य निधीत योगदान करत नसल्यास अशा कर्मचाऱ्यांसाठी कर मुक्त मर्यादा पाच लाख रुपयांची असेल.
  2. ईपीएफओ द्वारे प्रत्येक वर्षी जाहीर केलेल्या व्याज दरानुसार, पाच लाखांच्या मर्यादेच्या आत 93 टक्के नोकरदारांचा समावेश होतो आणि त्यांना करमुक्त व्याज लाभ प्राप्त होतो.
  3. आस्थापनांद्वारे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के ईपीएफ मध्ये योगदान दिले जाते आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून 12 टक्के कपात केली जाते. आस्थापनांच्या योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेत (ईपीएस) वर्ग केली जाते. सदर रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही.
  4. नवीन नियमांत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त योगदानावरील व्याज करपात्र असेल. संपूर्ण योगदान कर आकारणीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
  5. 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा अतिरिक्त रक्कम कर कपातीसाठी पात्र ठरणार नाही. सर्व योगदान गैर करपात्र योगदान म्हणून ग्राह्य धरले जाईल.
  6. दुसऱ्या अकाउंटवर (कर योग्य) मिळणाऱ्या खात्यावर प्रत्येक वर्षी कर आकारणी केली जाईल.
  7. करपात्र खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर योगदान दिलेल्या वर्षासाठीच केवळ आकारणी केली जाणार नाही. अन्य सर्व वर्षांसाठी कर आकारणी केली जाईल.

Follow Us
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा!
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...