AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Mandir : अयोध्येत मिळाले प्राचीन मंदिराचे अवशेष, रामभक्तांनी घेतली धाव

Ayodhya Mandir : अयोध्येतील राम मंदिर परिसरात खोदकाम करताना पुन्हा एकदा प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले. यामध्ये खांब, मूर्ती, शिलालेख यांचा समावेश आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी ही माहिती दिली. त्यामुळे रामभक्तांनी मंदिराकडे धाव घेतली. राम मंदिराचे निर्माण कार्य आता अंतिम टप्प्यात पोहचले आहे.

Ayodhya Mandir : अयोध्येत मिळाले प्राचीन मंदिराचे अवशेष, रामभक्तांनी घेतली धाव
| Updated on: Sep 14, 2023 | 10:11 AM
Share

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराचे (Ram Temple Ayodhya) बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहचले आहे. मंदिर परिसरात अनेक ठिकाणी अजूनही खोदकाम सुरु आहे. भव्य दिव्य मंदिरासाठी हे खोदकाम सुरु आहे. जगभरासाठी हे आकर्षणाचे केंद्र असावे. भक्तांना कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी याठिकाणी अनेक विकास कामे सुरु आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. श्री राम जन्मभूमी (Shri Ram Janmabhoomi Teertha Kshetra) ठिकाणी खोदकाम करताना प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाले. यामध्ये खांब, मूर्ती, शिलालेख यांचा समावेश आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय (Champat Rai) यांनी ही माहिती दिली. ही बातमी वाऱ्यासारखी अयोध्या आणि आजूबाजूच्या परिसरात पोहचली. लागलीच रामभक्तांनी मंदिराकडे धाव घेतली. या प्राचीन मंदिराचे अवशेष सध्या विकास सुरु असलेल्या ठिकाणीच ठेवण्यात आले आहे.

छायाचित्र सोशल मीडियावर

चंपत राय यांनी सोशल मीडिया साईट एक्स वर या प्राचीन मंदिराच्या मिळालेले अवशेषांचे छायाचित्र पण शेअर केले. यामध्ये खांब, मूर्ती, शिलालेख दिसून येत आहेत. श्री रामजन्मभूमी परिसरात खोदकाम करताना प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाले. यामध्ये अनेक खांब, मूर्ती यांच्यासह शिलालेख यांचा समावेश आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

अवशेष किती जूने

प्राचीन मंदिराचे भग्नावशेष कोणत्या शतकातील आहे. ते किती जूने आहेत, शिलालेखावर काय माहिती आहे, याची त्यांनी माहिती दिली नाही. तसेच खांबावरुन शैली, नक्षीकाम याची माहिती समोर आली नाही. या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत, त्याविषयीची माहिती समोर आलेली नाही. भाविकांना या प्राचीन वारशाची माहिती व्हावी यासाठी हे अवशेष मंदिर परिसरात ठेवण्यात आले आहे. वार्ता कानी येताच भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे.

पुढील वर्षी प्राण प्रतिष्ठा

प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिर परिसरात अनेक विकास कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. सध्या फिनिशिंगचे काम सुरु आहे. इतर अनेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर काही अंतिम टप्प्यात आहेत. जानेवारी 2024 मध्ये या ठिकाणी रामललांची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विश्वव्यापी करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. (Latest Marathi News) संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषदेने त्यासाठीची जबाबदारी घेतली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.