AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder : 75 लाख मोफत गॅस कनेक्शन! मोदी सरकारकडून मोठी भेट

LPG Cylinder : केंद्र सरकारने देशातील 75 लाख महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. या योजनेतंर्गत महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे.

LPG Cylinder : 75 लाख मोफत गॅस कनेक्शन! मोदी सरकारकडून मोठी भेट
LPG Gas Cylinder
| Updated on: Sep 13, 2023 | 5:02 PM
Share

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त महिलांना मोठी भेट दिली होती. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीत सरसकट 200 रुपयांची सवलत दिली. तर उज्ज्वला योजनेतर्गंत 400 रुपयांची सवलत देण्यात आली. केंद्र सरकारने आता देशातील 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने ही आनंदवार्ता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. पुढील तीन आर्थिक वर्षांत गॅस सिलेंडरची जोडणी करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत या महिलांना लाभ मिळणार आहे.

1,650 कोटींचा तिजोरीवर भार

मंत्रीमंडळाने आज पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) हे नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत या गॅस कनेक्शनची जोडणी करण्यात येणार आहेत. 75 लाख एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटींचा बोजा पडणार आहे. निवडणुकीचा हंगाम लवकरच सुरु होत आहे. चार राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. तर पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे ही सरबराई करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

9.60 कोटी गॅस कनेक्शन

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी या घडामोडींची माहिती दिली. त्यानुसार जगभरातील संस्थांनी केंद्रांच्या उज्ज्वला योजनेचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात मोठा बदल आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेतंर्गत आतापर्यंत 9.60 कोटी गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तीन वर्षांत 75 लाख कनेक्शन देण्यात येणार आहेत.

कोणाला होणार फायदा

देशातील गरीब कुटुंबांना याचा फायदा होईल. यापूर्वी केंद्र सरकारने 9.60 कोटी गॅस कनेक्शन दिले आहेत. पहिले रिफिल आणि शेगडी पण मोफत देण्यात येते. त्यासाठीचा खर्च ऑईल कंपन्या करतात. कॅबिनेटने यासोबतच ई-कोर्टस प्रोजेक्टच्या तिसऱ्या टप्प्याला पण मंजुरी दिली आहे. त्यासाठी 7210 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

सिलेंडरच्या किंमती झाल्या कमी

रक्षाबंधन निमित्त केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांची कपात केली होती. या कपातीनंतर गॅस सिलेंडरच्या किंमती दिल्लीत 903 रुपये झाल्या. तर उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी या किंमती 703 रुपये इतक्या झाल्या. येत्या काळात निवडणुकांचा हंगाम लक्षात घेता, केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्याची शक्यता आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.